---Advertisement---

IND vs AUS Test । भारतासाठी चौघांची शानदार अर्धशतके, ऑस्ट्रेलिया पराभवाच्या दिशेने

On: शुक्रवार, डिसेंबर 22, 2023 7:36 PM
Deepti Sharma
---Advertisement---

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ आमने सामने आहेत. उभय संघांतील एकमात्र कसोटी सामना याठिकाणी गुरुवारी (21 डिसेंबर) सुरू झाला. सामन्याचा दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघ 157 धावांनी आघाडीवर आहे. 119 षटकांमध्ये भारताने सलामीवीर स्मृती मंधाना, रिचा घोष, जेमिमाह रॉड्रिग्ज आणि त्यानंतर दीप्ती शर्मा यांनी अप्रतिम खेळी केल्यामुळे भारताला ही मजल मारता आली.

उभय संघांतील या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ पहिल्याच दिवशी सर्वबाद झाला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 219 (77.4 षटके) धावा केल्या. प्रत्युत्तरात पहिल्या दिवसाखेर भारताची धावसंख्या एक बाद 98 धावा होती. दुसऱ्या दिवसाच्या शेवटी भारताने 7 विकेट्सच्या नुकसानावर 376 धावांपर्यंत मजल मारली आहे. दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर या दोघी खेळपट्टीवर कायम आहेत. दिवसाखेर दीप्तीने 147 चेंडू खेळल्यानंतर 70* धावा केल्या आहेत, तर पूजा 33* धावावर आहे.

दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियासाठी एशले गार्डनर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तीने पहिल्या डावात तब्बल 41 षटके गोलंदाजी केली असून 100 धावा खर्च केल्या आहेत. यानंतर तिला चार महत्वाच्या विकेट्स नावावर करता आल्या. यात स्नेह राणा (9), हरमनप्रीत कौर (0), यास्तिका भाटिया (1) आणि जेमिमाह रॉड्रिग्ज (73) यांचा समावेश आहे. कीम गार्थ हिलाही रिचा घोष (52) हिच्या रुपात एक विकेट मिळाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने शेफाली वर्मा (40) हिची विकेट गमावली होती. ही विकेट जेस जॉनासेन हिने घेतली होती.

एकंदरीत पाहता दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघ भक्कम स्थितीत दिसतो. एकूण चार खेळाडूंना संघासाठी अर्धशतके केली आहेत. पहिल्या डावात भारताने मोठी आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रदर्शनावर याचा परिणाम होताना दिसू शकतो. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियासाठी ताहलिया मॅकग्राथ सोडून एकही फलंदाज अर्धशतक करू शकली नव्हती. (Indian women’s team leads Australia by 157 runs at the end of the second day of the Test match)

दोन्ही संघांची प्लेइंग 11 –
भारत महिला: स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), ऋचा घोष, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकुर सिंह, राजेश्वरी गायकवाड.

ऑस्ट्रेलिया महिला: बेथ मूनी, फिबी लिचफील्ड, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्राथ, एलिसा हिली (कर्णधार/यष्टीरक्षक), एनाबेल सदरलँड, एशले गार्डनर, जेस जोनासेन, अलाना किंग, किम गार्थ, लॉरेन चीटल.

महत्वाच्या बातम्या – 
डीन एल्गरचा मोठा निर्णय, माजी कर्णधार भारताविरुद्ध खेळणार कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका
Tushar Deshpande Marriage: CSK चा खेळाडू तुषार देशपांडे अडकला लग्नबंधनात, ‘स्कूल क्रश’सोबत घेतले सात फेरे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---