---Advertisement---

टीम इंडियाच्या या महिला क्रिकेटर्सने दिली यो यो टेस्ट

---Advertisement---

मागील काही महिन्यांपासुन यो-यो टेस्टची खूप चर्चा झाली आहे. भारतीय पुरुष संघात स्थान मिळवण्यासाठी ही फिटनेस टेस्ट पार करणे बीसीसीआयने सक्तीचे केले होते. पण आता बहुतेक महिलांनाही ही टेस्ट सक्तीची केली असण्याची शक्यता आहे.

त्यामुळे महिला खेळाडूंनी राष्ट्रीय क्रिकेट आकादमीमध्ये सध्या त्यांच्या चालू असलेल्या त्यांच्या कॅम्पदरम्यान ही यो-यो दिली आहे.

याचा फोटो भारतीय संघातील अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीने सोशल मिडियावर शेअर करत दिली आहे. या फोटोमध्ये गोस्वामीबरोबर अन्य महिला खेळाडूही आहेत. तसेच तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे की, “यो-यो टेस्ट झाली”

त्यामुळे महिला क्रिकेटपटूंनाही ही टेस्ट देण्यास सांगण्यात आले आहे हे स्पष्ट झाले असले तरी संघनिवडीसाठी ही सक्तीची आहे का,याबद्दल अजून कोणती माहिती मिळालेली नाही.

सध्या महिला संघ सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्याची प्रभारी प्रशिक्षक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच महिला संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक तुषार आरोठे यांचे काही संघातील वरिष्ठ खेळाडूंबरोबर वाद झाल्याने भारतीय महिला संघाने प्रशिक्षक बदण्याची विनंती केली होती.

यामुळे आरोठे यांनीच या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता महिला संघाच्या नवीन प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

दोन महिने आधीच बंगालने केला रणजी संघाचा कर्णधार घोषीत

क्रिकेटचा प्रचार करण्यासाठी जपानची ही अनोखी कल्पना

भारताचे फलंदाज-गोलंदाज चमकले, एकमेव सराव सामना अनिर्णित

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment