---Advertisement---

आता फेसबुक-यूट्यूबवर पाहा भारतीय संघाचे लाईव्ह सामने! हरमनप्रीतचा संघ बांगलादेशात दाखल

On: शुक्रवार, जुलै 7, 2023 3:51 PM
Indian Womens Team
---Advertisement---

भारतीय महिला संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातात भारत आणि बांगलादेश संघात वनडे आणि टी-20 मालिका खेळल्या जाणार आहेत. दोन्ही मालिका प्रत्येकी तीन-तीन सामन्यांच्या असतील आणि हे सर्वच्या सर्व सामने मीरपूरच्या शेर-ए-बांगला क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहेत.

भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh Women’s Cricket) महिला सांघातील टी-20 मालिका 9 जुलै रोजी सुरू होणार असून वनडे मालिकेची सुरुवात 16 जुलै रोजी होणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीबीच्या अधिकृत फेसबूक पेज आणि यूट्यूब चॅनलवर या मालिकाचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. म्हणजेच या दोन्ही मालिका पाहण्यासाठी चाहत्यांना कुठलेच पैसे खर्च करावे लागणार नाहीत. भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी (6 जुलै) या मालिकेसाठी बांगलादेशमध्ये दाखल झाला आहे.

या बांगलादेश दौऱ्यासाठी भारताचा 18 सदस्यीय महिला संघ आधिच घोषित केला गेला होता. भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंग आणि यष्टीरक्षक ऋचा घोष (Richa Ghosh) या दोघींना या संघातून बगळण्यात आले आहे. सोबतच ऑफ स्पिनर श्रेयांका पाटील हिला देखील संधी दिली गेली नाहीये. हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) या दौऱ्यात नेतृत्व करणार असून उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) उपकर्णधार असणार आहे. यष्टीरक्षक ऋचा घोषला संघातून बाहेर केल्यामुळे आक्श्चर्य व्यक्त केले जात आहे. संघ व्यवस्थापनाकडून याचे कारणही स्पष्ट केले गेले नाहीये.

बांगलादेश दौऱ्यासाठी निवडलेला भारतीय संघ –
भारताचा वनडे संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रीग्ज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हरलीन देओल, देविका वैद्य, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, प्रिया पुनिया, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह , अंजलि सरवानी, मोनिका पटेल, राशी कनॉजिया, अनुषा बारेड्डी, स्नेह राणा.

भारताचा टी-20 संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रीग्ज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हरलीन देओल, देविका वैद्य, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, एस मेघना, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, अंजली सरवानी, मोनिका पटेल, राशी कनॉजिया, अनुषा बारेरेड्डी, मिन्नू मणि.

टी-20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
9 जुलै- पहिली T20I
11 जुलै- दुसरी T20I
13 जुलै- तिसरी T20I

वनडे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
16 जुलै- पहिली वनडे
19 जुलै- दुसरी वनडे
22 जुलै- तिसरी वनडे

महत्वाच्या बातम्या –
मोठ्या मनाची टीम इंडिया! वेस्ट इंडीजमध्ये दाखवलेल्या औदार्याने होतेय कौतुक , व्हिडिओ पाहाच
बाप कर्णधार असला तरीही धोनी खेळला आहे ‘या’ ५ सिनीयर-ज्युनियर कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---