भारतासाठी टोकियो ऑलिंपिक्स २०२०चा तेरावा दिवस (४ ऑगस्ट) खूपच आनंदाचा असल्याचे ठरत आहे. कारण, भालाफेकीत नीरज चोप्राने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. दुसरीकडे रवी कुमार दहियानेही उपांत्यपूर्व सामन्याचे तिकीट मिळवले आहे. आता यात आणखी एका कुस्तीपटूचा समावेश झाला आहे. तो म्हणजे दीपक पुनिया होय.
पुरुषांच्या ८६ किलो वजनी गटाच्या १/८ फायनल राऊंडमध्ये भारताचा कुस्तीपटू दीपक पुनियाने नायझेरियाच्या एकेरेमकेमे एजीओमोरला १२-१ ने विजय मिळवला. यासह त्याने उपांत्यपूर्व सामन्यात प्रवेश केला आहे. Indian wrestler Deepak Punia defeats Ekerekeme Agiomor of Nigeria in men’s freestyle (86kg)
https://twitter.com/Media_SAI/status/1422764213483708420
द्वितीय मानांकित दीपक कुमारने पहिला राऊंड ४-१ ने आपल्या नावावर केला. त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये तो सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवत गुण मिळवत राहिला. त्याने ८-१ ने आघाडी घेतल्यानंतर पुन्हा एकदा ४ गुण मिळवले, तेव्हा रेफरीने हा सामना दुसऱ्या राऊंडमध्येच थांबवला. तसेच दीपकला गुणांच्या आधारे १२-१ ने विजयी घोषित करण्यात आले.
उपांत्य सामन्यात दीपकचा सामना चीनच्या लिन झुशेनशी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-बेलारूसच्या इरियानाकडून अंशू मलिकचा दारुण पराभव; तरीही जिंकू शकते कांस्य पदक
-लय भारी! रवी दहियाने कोलंबियाच्या कुस्तीपटूवर मिळवला १३-२ ने एकतर्फी विजय; गाठली उपांत्यपूर्व फेरी
-व्वा रे पठ्ठ्या! भालाफेक खेळातून इंडियाला पदकाची आशा, नीरज चोप्राने मिळवलं फायनलचं तिकीट




टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा