उत्तर प्रदेशच्या गौडामध्ये खेळल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये निशा दहियाने सुवर्ण पदक जिंकले आहे. तत्पूर्वी सुवर्ण पदक जिंकण्याच्या एक दिवस आधी निशाविषयी एक खोटी बातमी बाहेर आली होती आणि प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती. आदल्या दिवशी चुकीच्या ओळखीमुळे निशा दहियाचा मृत्यू झाला, अशा चुकीची चर्चा झाली होती. या चर्चेच्या दुसऱ्याच दिवशी निशाने राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या ६५ किलो वजनी गटात पहिला क्रमांक मिळवला आहे.
निशाने या लढतीमध्ये अप्रतिम प्रदर्शन केले आहे. तिने तिची पंजाबची प्रतिस्पर्धी जसप्रीत कौरला ३० सेकंदामध्ये चित केले आहे. यापूर्वी निशाला उपांत्य लढतीत हरियाणाच्या प्रियंकाने चांगले आव्हान दिले होते.
निशा यापूर्वी २३ वर्षाखालील विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक विजेती आहे. ती सध्या राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये रेल्वेचे प्रतिनिधित्व करत आहे. निशासाठी हे तिचे राष्ट्रीय चॅम्पियनशिपमधील तिसले सुवर्ण पदक आहे. निशाने हे पदक जिंकल्यानंतर सांगितले की, हा प्रत्यक्षात माझ्या अभियानाचा सुखद आणि अप्रतिम शेवट आहे.
मी बुधवारपासून खूप तणावात होते. मला झोपही लागत नव्हती. वजन कमी असल्यामुळे मी पहिल्यापासूनच कमी ऊर्जावान होते आणि अशात या घटनेला सामोरे जाणे अवघड होते. रिपोर्ट्समध्ये आधी सांगितले गेले होते की, निशाची सोनीपतमध्ये हत्या करण्यात आली, पण नंतर समजले की, हत्या झालेली ती उदीयमान पैलवान होती आणि तिचे नावही निशा होते.
निशा पुढे बोलताना म्हणाली की, ‘मला सतत फोन येत होते आणि मी माझा फोन बंद केला. हे तणावपूर्ण बनले होते आणि मी केवळ स्पर्धेवर लक्ष केंद्रित करू इच्छित होते. शेवटी मी कामगिरी प्रभावित होऊ दिले नाही.
शेफाली आणि प्रियंकाने त्यांचे प्लेऑफ सामने जिंकून कांस्य पदक जिंकले. याआधी उपांत्य लढतीमध्ये जसप्रीतने हरियाणाच्या शेफालीला ६-४ आणि निशाने प्रियंकाला ७-६ असे पराभूत केले होते. महिलांच्या ७६ किलो वजनी गटात ३७ वर्षीय गुरशरणप्रीत कौरने सुवर्ण पदक जिंकले.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकानंतर शास्त्रींबरोबरच ‘हे’ दिग्गजही सोडू शकतात टीम इंडियाची साथ