भारतीय कुस्तीपटू निशा दहियाचा महिलांच्या 68 किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. उत्तर कोरियाच्या सोल गमने तिचा 10-8 अशा फरकानं पराभव केला. यासह निशाचा 2024चा ऑलिम्पिकमधील प्रवास संपला. दुसऱ्या हाफला सुरुवात होण्यापूर्वी निशा 4-0 अशी आघाडीवर होती, पण दुसऱ्या हाफमध्ये तिचा कोपर किंवा खांद्याचा सांधा निखळल्यासारखे वाटलं. या सामन्यात तीला मोठी दुखापत झाली.
उत्तर कोरियाच्या कुस्तीपटूनं या संधीचा फायदा घेत 11 सेकंदात चार गुण मिळवले आणि स्कोर 8-8 असा बरोबरीत सुटला. जेव्हा सामना संपायला 12 सेकंद बाकी होते. त्यानंतर निशाला आणखी वेदना जाणवू लागल्या आणि सामना पुन्हा थांबवण्यात आला. फिजिओने निशावर उपचार केले, पण निशाकडे पाहून उजव्या हाताला तीव्र वेदना होत असल्याचे दिसून आले.
त्यावेळी ती रडू लागली. मात्र, ती अजूनही जिंकू शकते, असे प्रशिक्षकानं निशाला सांगितले. स्कोर 8-8 असा बरोबरीत राहिला असता तर निशा उपांत्य फेरीत पोहोचली असती. मात्र, शेवटच्या 12 सेकंदात उत्तर कोरियाच्या कुस्तीपटूनं 2 गुण मिळवले आणि सामना 10-8 असा जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs SL शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ‘या’ खेळाडूचं होणार संघात पुनरागमन?
अय्यर, राहुल यांच्याआधी शिवम दुबे फलंदाजीला का आला? सहाय्यक प्रशिक्षक नायरने सांगितले कारण
SLvsIND : तिसरी वनडे जिंकत टीम इंडियाकडे इतिहास रचण्याची संधी, पूर्ण होऊ शकतं खास ‘शतक’