कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज अशी ओळख असलेल्या स्टीव स्मिथने पुन्हा एकदा आपल्या कौशल्याची सर्व क्रिकेट विश्वाला जाणीव करून दिली. भारताविरुद्धच्या मालिकेतील सुरूवातीच्या दोन सामन्यात विशेष कामगिरी करू न शकणार्या स्मिथने सिडनी येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत उत्तम कामगिरी केली. स्मिथने पहिल्या डावात 131 तर दुसऱ्या डावात 81 धावांची खेळी केली आहे. मात्र भारतासाठी स्मिथ विरुद्ध आशेचा किरण ठरला तो रविचंद्रन आश्विन. अश्विनने दुसऱ्या डावात स्मिथला बाद केले.
या संपूर्ण मालिकेत अश्विनने स्मिथला आतापर्यंत 3 वेळा बाद केले आहे. तसेच अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथला सर्वाधिक वेळा बाद करणारा भारतीय गोलंदाज देखील आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत अश्विनने स्मिथला 6 वेळा बाद केले आहे. यानंतर क्रमांक येतो तो रवींद्र जडेजा आणि उमेश यादव यांचा. जडेजा व उमेश यांनी स्मिथला प्रत्येकी 4 वेळा बाद केले आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भुनेश्वर कुमार येतो, ज्याने स्मिथला 2 वेळा बाद केलेले आहे. स्मिथ सारख्या जगातील सर्वोत्तम कसोटी फलंदाजाला 6 वेळा बाद करणे अश्विनीसाठी मानाची बाब आहे.
तिसऱ्या सामन्याचा विचार केला असता ऑस्ट्रेलियाने पूर्णपणे सामना आपल्याकडे वळवला आहे. ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 6 बाद 312 धावांवर घोषित करत पहिल्या डावातील 94 धावांच्या आघाडीसह भारताला विजयासाठी 407 धावांचे मोठे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने दुसऱ्या डावात चौथ्या दिवसाखेर 2 बाद 98 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
वर्णद्वेषी टिप्पणी करणार्या प्रेक्षकांवर आजीवन बंदी घालावी, माजी खेळाडूने केली मागणी
ही तर हद्द झाली! भारतीय खेळाडूंवर झालेल्या वर्णद्वेषी टीकेबद्दल ‘कर्णधार’ विराट संतापला
“टीम इंडिया दुसऱ्या डावात २०० धावा देखील करु शकणार नाही”, पहा कोणी केलंय हे वक्तव्य