भारतीय गोलंदाज आयपीएल २०२२मध्ये अक्षरश: भल्याभल्या फलंदाजांच्या दांड्या गुल करताना दिसत आहेत. युवा गोलंदाज आपल्या धारदार गोलंदाजीने दिग्गज फलंदाजांना संकटात टाकत आहेत. सध्या इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा हंगाम सुरू आहे. यातील अर्ध्याच्या वर सामने खेळून झाले आहेत. यामध्ये भारतीय गोलंदाजांचाच दबदबा पाहायला मिळत आहे. गुरुवारी (दि. २८ एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात आयपीएलचा ४१वा सामना पार पडला. या सामन्यात दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी केली आणि एक खास विक्रम आपल्या नावावर केला.
झाले असे की, नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत १४६ धावा केल्या. यावेळी दिल्लीच्या कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) कोलकाताच्या ४ फलंदाजांना तंबूत धाडले.
Another match against KKR, but Kuldeep is writing a very similar script 💙#YehHaiNayiDilli | #IPL2022#TATAIPL | #IPL | #DelhiCapitals | #DCvKKR pic.twitter.com/sPm4cNZm4j
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 28, 2022
यावेळी कुलदीप यादवने ८व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाबा इंद्रजितला (Baba Indrajith) ६ धावांवर आणि त्यानंतर याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर सुनील नारायणला (Sunil Narine) पायचीत केले. त्यानंतर १४व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) ४२ धावांवर रिषभ पंतच्या (Rishabh Pant) हातून झेलबाद केले. त्यानंतर त्याने याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर आंद्रे रसेलला (Andre Russell) शून्य धावेवर स्वत:च झेलबाद केले.
या ४ विकेट्समुळे कुलदीप आयपीएल २०२२मध्ये ४१व्या सामन्यानंतर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याने एकूण १७ विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, या यादीत अव्वलस्थानी कुलदीप यादवचा खास मित्र आणि राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आहे. त्याने १८ विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे, तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तरीत्या वेगवान गोलंदाज टी नटराजन आणि उमरान मलिक आहेत. दोघांनीही प्रत्येकी १५ विकेट्स घेतल्या आहेत.
या आकडेवारीवरून दिसून येते की, आयपीएल २०२२मध्ये ४१ सामने खेळून झाल्यानंतर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये भारतीय खेळाडूंचाच दबदबा कायम आहे.
आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
१८ विकेट्स- युझवेंद्र चहल
१७ विकेट्स- कुलदीप यादव*
१५ विकेट्स- टी नटराजन
१५ विकेट्स- उमरान मलिक
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भल्याभल्या फलंदाजांच्या दांड्या गुल करणाऱ्या उमरानची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘एके दिवशी…’
वेगाचे बादशाह! उमरान मलिक ते इशांत शर्मा, जाणून घ्या कोण आहे भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज
गुरू तसा शिष्य! हैदराबाद फलंदाजांच्या दांड्या उडवत उमरान मलिकचे ‘स्टेन’ स्टाईल सेलिब्रेशन