---Advertisement---

आयसीसी महिला वनडे क्रमवारीत भारताच्या ‘या’ त्रिकुटाचे नाणे खणकतयं; वाचा सविस्तर

---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुरूष आणि महिला यांची सर्व क्रिकेट प्रकारातील क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील तुफानी फलंदाज स्रिती मंधाना आणि गोलंदाज झूलन गोस्वामी यांनी वनडे क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे.

स्म्रिती (Smriti Mandhana) हीने फलंदाजांच्या यादीत ६६९ गुणांसह आठवे स्थान काबीज केले आहे. झुलन गोलंदाजांच्या यादीत ६६३ गुणासंह पहिल्या पाचमध्ये पोहोचली आहे. महिला चॅम्पियनशीपमध्ये दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडवर नऊ विकेट्सने विजय मिळवला होता. या सामन्यात लारा गुडॉल आणि कर्णधार सुने लुस यांनी उत्तम कामगिरी केल्याने आयसीसी महिला फलंदाजांच्या यादीत मोठी उडी घेतली आहे.

आयर्लंडच्या सामन्यात गुडॉलने नाबाद ३२ केल्याने तिने नऊ स्थानांनी पुढे जात ५८व्या स्थानांवर पोहचली आहे. लुस या फिरकी गोलंदाजाने १६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. तिने गुडॉलसह नाबाद २१ धावांची भागीदारीही केली आहे. या कामगिरीने तिने सात स्थानांनी उडी घेत ३९वे स्थान गाठले आहे.

आयसीसी महिला वनडे क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची एलिसा हेली ७८५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडची नताली स्किवर दुसऱ्या स्थानावर आहे. गोलंदाजीत इंग्लंडची सोफी एकलेस्टोन ७७१ गुणासंह पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेची शबमीन इस्माईल ७३६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

आयसीसी महिलाच्या वनडे अष्टपैलू खेळाडूंमध्ये भारताची दिप्ती शर्मा सातव्या आणि झुलन दहाव्या स्थानावर आहेत. यामध्ये नताली स्किवरने ३९३ गुणांसह पहिले स्थान काबिज केले आहे.

भारतीय संघ आयसीसी वनडे आणि टी२० क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानावर कायम आहे.

भारतीय महिला संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात तीन सामन्यांची टी२० आणि वनडे मालिका खेळल्या जाणार आहेत. यातील पहिला टी२० सामना २३ जूनला दम्बुल्ला येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध मागील चार सामने जिंकले आहेत. या मालिकेतील शेवटचा वनडे सामना ७ जुलैला पल्लेकेले येथे खेळला जाणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘मी टीम इंडियाकडून खेळण्याच्या लायक नाही’, राजस्थान रॉयल्सच्या युवा फलंदाजाने स्वत:च केले मान्य

प्रतिभा असूनही मुंबई इंडियन्सने सलग दोन वर्षे अर्जुनला फक्त बेंच गरम करत का ठेवलंय?

INDvsSA: आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ‘तो’ महापराक्रम करण्यासाठी भुवनेश्वर फक्त एक पाऊल दूर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---