इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. या हंगामाचा दुसरा क्वालिफायर सामना रविवारी (८ नोव्हेंबर) अबु धाबीमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघात रंगला. या सामन्यात ‘गब्बर’ म्हणून ओखळला जाणाऱ्या शिखर धवनच्या फलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला. त्याने ताबडतोब खेळी करत खास विक्रमाची आपल्या खात्यात नोंद केली.
ठरला एका हंगामात ६०० धावा करणारा सातवा भारतीय
या सामन्यात नाणेफेक जिंकत दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि मर्यादित २० षटकात १८९ धावा करत हैदराबादपुढे १९० धावांचे भलेमोठे लक्ष्य ठेवले. दरम्यान धवनने संघाला विजय मिळवून देण्याच्या दृष्टीने जोरदार फटकेबाजी केली. त्याने केवळ ५० चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७८ धावा लगावल्या. यासह धवनने या हंगामातील त्याच्या ६०० धावा पूर्ण केल्या आहेत.
त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात ६०० धावांचा आकडा पार करणारा धवन सातवा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्यापुर्वी आयपीएल २०२०मध्येच किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने या हंगामात एकूण १४ सामन्यात ६७० धावा केल्या आहेत. यापूर्वी २०१८ सालीही त्याने पूर्ण हंगामात ६५९ धावा कुटल्या होत्या.
याबरोबरच सचिन तेंडुलकर (२०१०), विराट कोहली (२०१३, १६) रॉबिन उथप्पा (२०१४) रिषभ पंत (२०१८) आणि अंबाती रायडू (२०१८) या भारतीय फलंदाजांनीही आयपीएलच्या एका हंगामात ६००पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मसाला डोसा आणि मसाला ऑमलेट’, ‘या’ खेळाडूने सांगितले जबरा सिक्सर मारण्यामागचे रहस्य
आयपीएल २०२० लिलावात ‘हे’ काम करताच मुंबईला सापडली यशाची किल्ली!
हे मल्ल्या उठा ले! आरसीबीचा स्वप्नभंग झाल्यानंतर चाहती लागली ढसाढसा रडायला; Video व्हायरल
ट्रेंडिंग लेख-
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा