कसोटी क्रिकेट हा एक असा क्रिकेट प्रकार आहे, जिथे फलंदाजांची नेहमीच खरी कसोटी पाहिली जाते. कसोटी क्रिकेटच्या खेळपट्टीवर चेंडू फिरला किंवा जरासा वळला तरी फलंदाजांना धावा करणे कठीण होते. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या दोन दिवसानंतर फलंदाजी करणे अवघड होते, कारण खराब झालेल्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे हे एक मोठे आव्हान मानले जाते.
याच कारणास्तव, कसोटी क्रिकेट प्रकारातील चौथा डाव सर्वात कठीण मानला जातो. चौथ्या डावात खेळणार्या संघाला कसोटी सामन्याच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी फलंदाजी करावी लागते. जेथे फलंदाजाच्या संयमाची कठोर परीक्षा घेतली जाते. ज्यामध्ये मोठ्या फलंदाजांना यावर मात करणे कधीच सोपे राहिले नाही.
पण भारतीय क्रिकेट संघात असे काही फलंदाज आहेत, ज्यांनी कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात स्वत:ला सिद्ध केले आहे. आज या लेखात आपण भारताच्या त्या ५ फलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी कसोटीच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा केल्या आहेत.
१. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)
सचिन तेंडुलकर हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा फलंदाज आहे. त्याने शतकांचे शतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सचिन केवळ भारतीय क्रिकेटच नाही तर जागतिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाज आहे, ज्याने कसोटी किंवा वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.
आपल्या कारकिर्दीत भारतीय संघाकडून खेळताना सचिनने कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात शानदार प्रदर्शन केले आहे. सचिनने चौथ्या डावात ३ शतकांसह ३६.९३ सरासरीच्या मदतीने १६२५ धावा केल्या आहेत.
२. राहुल द्रविड (Rahul Dravid)
जेव्हा जेव्हा जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम कसोटी फलंदाजांबद्दल बोलले जाते, तेव्हा माजी भारतीय फलंदाज राहुल द्रविडचा उल्लेख नक्कीच केला जातो. खेळपट्टीवर टिकून राहण्याची प्रचंड क्षमता असल्यामुळे द्रविडला कसोटी क्रिकेटमधील महान फलंदाजांमध्ये गणले जाते.
द्रविडने कसोटीच्या चौथ्या डावात त्याच सामर्थ्याने अनेक चमत्कार केले आहेत. कारकिर्दीतील चौथ्या डावाबद्दल बोलायचे झाले, तर द्रविडने १ शतकाच्या व ४०.८४ च्या सरासरीच्या मदतीने एकूण १५५२ धावा केल्या आहेत. भारतासाठी हा दुसरा चौथ्या डावात सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज आहे.
३. सुनील गावसकर (Sunil Gavaskar)
भारतीय क्रिकेट इतिहासातील महान फलंदाजांविषयी बोलताना माजी फलंदाज लिटिल मास्टर सुनील गावसकर यांचे नाव आपोआपच तोंडातून बाहेर येते. गावसकर हे कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठे आणि महान फलंदाज ठरले आहेत.
कसोटी क्रिकेट इतिहासामध्ये प्रथमच दहा हजारांचा टप्पा गाठणाऱ्या गावसकरांनी कसोटीच्या चौथ्या डावात अतिशय प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांनी चौथ्या डावात ५८.२५ च्या सरासरीने १३९८ धावा केल्या आहेत.यामध्ये त्यांच्या ४ शतकांचाही समावेश आहे.
४. व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman)
व्हेरी- व्हेरी स्पेशल म्हणजेच व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय क्रिकेटमध्ये खूप चांगला फलंदाज म्हणून ओळखला जातो. आपल्या कारकिर्दीत लक्ष्मण हा भारतीय संघासाठी खूप खास फलंदाज होता.
लक्ष्मणने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या फलंदाजीने कठीण काळात नेहमीच संघाला बाहेर काढले आहे.
लक्ष्मणने आपल्या कसोटी कारकिर्दीतील चौथ्या डावात भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ४०.५६ च्या सरासरीने १ शतकाच्या मदतीने १०९५ धावा केल्या आहेत.
५. विराट कोहली (Virat Kohli)
सध्याच्या काळात कोणी जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठा फलंदाज असेल, तर तो भारताची रन मशीन विराट कोहली आहे. कर्णधार विराट क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये सध्याच्या काळात सर्वात मजबूत आणि जबरदस्त फलंदाज आहे.
त्याने आतापर्यंत भारताच्या कसोटी कारकिर्दीत विशेषत: चौथ्या डावात आपली क्षमता सिद्ध केली आहे. चौथ्या डावात विराटची फलंदाजी उत्तम आहे.
त्याने कसोटीच्या चौथ्या डावात आतापर्यंत २३ कसोटी सामने खेळले, असून २ शतकांच्या मदतीने व ४९.७७ च्या प्रभावी सरासरीने ८९६ धावा केल्या आहेत.
वाचनीय लेख-
-ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग २: लक्ष्मणच्या अंघोळीने थांबला होता चालू कसोटी सामना
-आयपीएलमध्ये ज्या संघाकडून खेळले, त्याच संघाचे कोच झालेले ५ दिग्गज
-पृथ्वी शॉ- शुबमन गिलमुळे या ‘५’ युवा खेळाडूंंचं करिअर सुरु होण्याआधीच संपू शकतं