---Advertisement---

जिथं कमी तिथं आम्ही! राहुल- रोहितलाही जे जमलं नाही, ते अश्विनने करून दाखवलं; वाचा बातमी

Ravichandran-Ashwin
---Advertisement---

भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 3 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0ने विजय मिळवला. भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलण्यात आर अश्विन याने मोठी भूमिका बजावली. विशेष म्हणजे, भारताच्या विजयासह अश्विनच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली आहे. त्यात रोहित शर्मा, केएल राहुल यांसारख्या दिग्गजांचा समावेश नाहीये. मात्र, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांचा या विक्रमाच्या यादीत समावेश आहे. चला तर अश्विनचा विक्रम पाहूयात…

भारतीय संघाचा विजय
भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत विजयासाठी 145 धावांचे आव्हान होते. यावेळी भारताला आव्हानाचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला. अनेक विश्वासू खेळाडू अनपेक्षितरीत्या कमी धावसंख्येवर बाद झाले. अक्षर पटेल वगळता वरच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांना दोन आखडी धावसंख्याही करता आल्या नाहीत. मात्र, आर अश्विन (R Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांच्या जोडीने भारताला विजय मिळवूनच द्यायचाच, असा निर्धार केला. अश्विन (42) आणि श्रेयसने (29) शेवटपर्यंत टिकून संघाला विजयी केले. यासोबत भारतीय संघाने आतापर्यंत बांगलादेशविरुद्ध एकही कसोटी सामना न गमावण्याचा विक्रम कायम ठेवला.

https://twitter.com/BCCI/status/1606890567979659267

अश्विनचा विक्रम
यादरम्यान अश्विनच्या नावावरही खास विक्रमाची नोंद झाली. अश्विन हा भारताने सर्वाधिक कसोटीत विजय मिळवताना संघाचा भाग बनणारा खेळाडू ठरला. त्याने ही कामगिरी 52 वेळा केली आहे. या यादीत अव्वल स्थानी सचिन तेंडुलकर आहे. सचिन 72 वेळा विजय मिळवणाऱ्या भारताच्या कसोटी संघात सामील होता.

या यादीत दुसऱ्या स्थानी राहुल द्रविड (Rahul Dravid) आहे. द्रविड भारताने मिळवलेल्या 56 कसोटी विजयात संघाचा भाग राहिला होता. त्याच्या पाठोपाठ तिसऱ्या स्थानी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) असून तो 56 वेळा भारताच्या विजयी कसोटी संघात सामील होता. या यादीत चौथ्या स्थानी विराट कोहली (Virat Kohli) असून तो 55 वेळा भारताच्या विजयी कसोटी संघाचा भाग होता. (Indians to be part of most Test Wins see list)

सर्वाधिक कसोटी सामने जिंकताना भारतीय संघाचा भाग असणारे खेळाडू
72 वेळा- सचिन तेंडुलकर
56 वेळा- राहुल द्रविड
56 वेळा- चेतेश्वर पुजारा*
55 वेळा- विराट कोहली*
52 वेळा- आर अश्विन*

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आतल्या गोटातील बातमी! मालिका विजयानंतर कर्णधार राहुल म्हणाला, ‘खोटं बोलणार नाही, ड्रेसिंग रूममध्ये…’
राहुलला तोडावी लागली धोनीची परंपरा, मालिका विजयानंतर ‘या’ खेळाडूच्या हातात सोपवली ट्रॉफी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---