भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने शुक्रवारी (दि. 09 जून) डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावत विक्रमांचे मनोरे रचले. रहाणे डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. याव्यतिरिक्त त्याने आणखी एक विक्रम केला. असा विक्रम करणारा तो भारतीय संघाचा 13वा भारतीय फलंदाज ठरला. त्याने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, कपिल देव यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले.
रहाणेचा विक्रम
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने 46 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर षटकार मारत अर्धशतक झळकावले. पुढे त्याने कॅमरून ग्रीन याच्या 55व्या षटकातील अखेरच्या नो-बॉलवर 2 धावा काढल्या आणि 69 धावा पूर्ण केल्या. या धावा पूर्ण करताच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये खास विक्रम रचला. त्याने त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 5000 धावांचा टप्पा पार केला.
रहाणे भारताकडून कसोटीत 5000 धावा पार करणारा 13वा खेळाडू ठरला. त्याच्यापूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावसकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, दिलीप वेंगसरकर, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद अझरुद्दीन, गुंडप्पा विश्वनाथ आणि कपिल देव यांनी कसोटीत 5000 धावा पूर्ण केल्या आहेत.
भारताच्या 250 धावा पूर्ण
भारतीय संघाने आपल्या डावाच्या तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत 60 षटके खेळताना 6 विकेट्स गमावत 260 धावा पूर्ण केल्या. यामध्ये अजिंक्य रहाणे नाबाद 89 धावांवर, तर शार्दुल ठाकूर नाबाद 36 धावांवर खेळत आहेत. (Indians to score 5,000 Test runs ajinkya rahane also in the list)
कसोटीत 5000 धावांचा टप्पा पार करणारे भारतीय खेळाडू
सचिन तेंडुलकर
राहुल द्रविड
सुनील गावसकर
व्हीव्हीएस लक्ष्मण
वीरेंद्र सेहवाग
विराट कोहली
सौरव गांगुली
चेतेश्वर पुजारा
दिलीप वेंगसरकर
मोहम्मद अझरुद्दीन
गुंडप्पा विश्वनाथ
कपिल देव
अजिंक्य रहाणे*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मानलं रे! 18 महिन्यांनी कमबॅक करत रहाणेने रचला इतिहास, WTC Finalमध्ये फिफ्टी झळकावणारा पहिलाच इंडियन
‘लायन सर्वकालीन महान फिरकीपटू”, भारताच्या माजी कर्णधाराने केली स्तुती