पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (babar azam) आणि मोहम्मद रिजवान(mohammad Rizwan) हे तुफान फॉर्ममध्ये आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांनी सतत चांगली कामगिरी करून पाकिस्तान संघाला विजय मिळवून दिला आहे. आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीत पोचवण्यात या दोन्ही फलंदाजांनी मोलाचे योगदान दिले होते. दरम्यान माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू राशिद लतिफने दोघांची तुलना विराट कोहलीी(Virat Kohli) आणि रोहित शर्मा (rohit sharma) सोबत करून मोठे वक्तव्य केले आहे.(Rashid Latif statement)
राशिद लतिफ यांचे म्हणणे आहे की, “गेल्या एक वर्षापूर्वी आम्ही म्हणायचो की, आमच्याकडे रोहित आणि कोहली सारखे फलंदाज नाहीये. मुख्यतः टी२० क्रिकेटमध्ये. परंतु, मला आता असे वाटते की, काही दिवसानंतर भारतीयदेखील बोलतील की, आमच्याकडे बाबर आणि रिझवान सारखे खेळाडू नाहीये.” मोहम्मद रिझवानने यावर्षी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत २००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. टी२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर त्याने बांगलादेशमध्ये जाऊनही अप्रतिम कामगिरी केली होती. त्यानंतर मायदेशात वेस्ट इंडिज संघाविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेत त्याने मालिकावीर पुरस्कार पटकावला होता.
तसेच पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम हा टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्यानंतर बांगलादेश दौऱ्यावर तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. तर नुकत्याच वेस्ट इंडिज संघाविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेतील तिसऱ्या टी२० सामन्यात त्याने तुफानी अर्धशतक झळकावले होते.
पाकिस्तान संघाने गेल्या काही महिन्यांपासून टी२० क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठल्यानंतर वेस्ट इंडिज आणि बांगलादेश संघाला त्यांनी एकही सामना जिंकू दिला नाहीये. पाकिस्तानच्या या यशामागे बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. यावेळी पाकिस्तान संघाने पहिल्यांदाच भारतीय संघाला टी२० विश्वचषक स्पर्धेत पराभूत केले होते.
महत्वाच्या बातम्या :
स्टिव्ह स्मिथची पुनरागमनात कर्णधारपदाला साजेशी खेळी, ‘फॅब फोर’मधील ‘या’ दिग्गजावर ठरला सरस
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची आगळीक! खेळाडूंना केस कापण्यास दिली नाही परवानगी; वाचा सविस्तर
ऍडलेड कसोटीत ‘या’ कारणामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बांधले ब्लॅक आर्म बँड, कारण ऐकून कोसळेल रडू