---Advertisement---

T20WC: फायनलमध्ये टीम इंडिया नाही पण इंडियन तडका! एमसीजीमध्ये 13 वर्षीय भारतीय मुलीचा जलवा

On: रविवार, नोव्हेंबर 13, 2022 10:05 AM
Janaki Easwar
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पुरूष क्रिकेट संघाच्या टी20 विश्वचषक 2022चा (T20 World Cup)अंतिम सामना रविवारी (13नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. यामध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) समोरासमोर येणार आहेत. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून दोन्ही संघाच्या खेळाडूंबरोबरच चाहतेही कधी एकदाचा सामना सुरू होतो याची वाट पाहत आहे. या सामन्यात भारतीय क्यूट मुलीचा जलवा पाहायला मिळणार आहे. जानकी ईश्वर नावाच्या या 13 वर्षीय मुलीचे भारताशी नाते जोडले गेले आहे.

तेरा‌ वर्षीय भारतीय गायिका जानकी ईश्वर (Janaki Easwar) टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधी होणाऱ्या समारोहात गाणे सादर करणार आहे. या स्पर्धेतून भारत उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत झाला आणि स्पर्धेबाहेर झाला. असे असले तरी एमसीजीवर भारतीय वंशाची ही मुलगी 90 हजार प्रेक्षकांसमोर ऑस्ट्रेलियन रॉक सादर करणार आहे. ती अंतिम सामन्यापूर्वी परफॉर्म करताना दिसणार आहे.

टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधी म्युझिकल प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात तिच्या आवाजातील गाणं ऐकायला मिळणार आहे. ती या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया रॉक ग्रुप आइसहाउससोबत परफॉर्म करणार आहे. याबाबत जानकी म्हणाली, “एमसीजीमध्ये एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर आणि ते पण जागतिक स्तरावर लाखो प्रेक्षकांसमोर परफॉर्म करणे माझ्यासाठी अविश्वसनीय अनुभव असेल. माझे आई-वडील क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. त्यांच्याद्वारेच मला ही संधी कळली. मी परफॉर्म करण्यास उत्सुक आहे. भारताने हा अंतिम सामना खेळला असता तर बरे झाले असते.”

https://www.instagram.com/p/Ckff9P5urZH/?utm_source=ig_web_copy_link

जानकीचे वडील अनुरुप दिवाकरण आणि आई दिव्या रवींद्र हे मुळचे केरळच्या कोझीकोडचे आहेत. 15 वर्षांपूर्वी ते ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. जानकीच्या पालकांनी तिला प्रथम भारतीय संगीताची ओळख करून दिली आणि ती पाच वर्षांची असताना तिने कर्नाटकी गायनाचे धडे घेण्यास सुरुवात केली. हळूहळू जानकीने पॉप गायनातही प्रभुत्व मिळवले. तिने ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजिन रिऑलटी शो ‘दी व्हाईस ऑस्ट्रेलिया’ या कार्यक्रमात अगदी लहान वयातच आपल्या आवाजाची जादू जगाला दाखवली. india’s 13 year old Janki Easwer will perform at t20 world cup final 2022 eng vs pak

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
…आणि हिटमॅन रोहित शर्मा झाला ‘स्टार क्रिकेटर’
अर्रर्र! आयर्लंडने इंग्लंडच्या खेळाडूचा केला पानउतारा, ट्वीटमधून करून टाकले जोरदार ट्रोल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---