सध्याचा भारतीय संघ अत्यंत मजबूत स्थितीत आहे. सध्याच्या भारतीय संघाची स्थिती पाहता दिसून येते, की गेल्या काही काळापासून भारतीय संघात खूप सुधारणा झाल्या. त्यामुळे अनेक मोठमोठ्या संघांसाठी आजचा भारतीय संघ एक मजबूत आणि कठीण प्रतिस्पर्धी आहे. मात्र नेहमी पासूनच भारतीय संघाची अशी स्थिती होती असे नाही.
एकेवेळी वेस्टइंडीज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, झिम्बाब्वे सारखे संघ मजबूत मानले जायचे. त्यामुळे विदेशी जमिनीवर जाऊन यजमान संघाला हरवणे तसे जिकरीचे काम होते. मात्र, ५० वर्षांपूर्वी म्हणजे २४ ऑगस्ट १९७१ साली भारतीय संघाने हा कारनामा केला होता.
अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडला त्यांच्याच मायभूमीत हरवून मालिका जिंकली होती आणि इतिहास रचला होता. आज त्या ऐतिहासिक कामगिरीचा सुवर्णमहोत्सव आहे. त्याच विजयाच्या आठवणींना भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी उजाळा दिला आहे.
भारतीय नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वेबसाईटवर अपलोड केलेल्या एका व्हिडिओमध्ये रवी शास्त्री यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये ते म्हणाले, “तब्बल ५० वर्षांपूर्वी भारतीय संघाने इंग्लंडला हरवत पहिल्यांदा इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. मी त्यावेळी केवळ ९ वर्षांचा होतो. तरीही मला त्या सामन्यातील प्रत्येक चेंडू पूर्णपणे आठवणीत आहे. मी रेडिओवर समालोचन ऐकत होतो, त्या वेळचे समालोचक देखील अत्यंत उत्कृष्ट होते.”
A special series win 👏
A new chapter in Indian cricket history 🙌As we celebrate 5⃣0⃣ years of #TeamIndia's historic 1971 Test series win in England, Head Coach @RaviShastriOfc reminisces his memories of that epic series. 🔝 👍
Full video 🎥 👇https://t.co/64rke20QF6 pic.twitter.com/PJghyG9mTQ
— BCCI (@BCCI) August 24, 2021
रवी शास्त्री यांनी अशाप्रकारे दिले ‘त्या’ सामन्यांच्या आठवणींना उजाळा
“तेव्हा तिसर्या आणि चौथ्या डावात अत्यंत मजबूत खेळ झाला होता. मला आठवते फारुख इंजिनियर यांनी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये धावा केल्या होत्या. पहिल्या डावात त्यांनी अर्धशतक लगावत ५९ धावा केल्या होते. तर दुसऱ्या डावात नाबाद २८ धावा केल्या होत्या. गुंडप्पा विश्वनाथ धावा करत होते. भारतीय संघाचे कर्णधार अजित वाडेकर यांनी देखील पहिल्या डावात धावा केल्या होत्या.”
“तसेच एकनाथ सोलकर यांनी आपली अष्टपैलू खेळी करत, गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागामध्ये भारतीय संघाला मोलाचे योगदान दिले होते. त्यांनी व्यंकट राघवन आणि चंद्रशेखर यांच्या गोलंदाजीवर जे २ झेल घेतले होते, ते अप्रतिम होते.”
“चंद्रशेखर यांनी जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्यांनी ३८ धावा देऊन ६ विकेट घेतल्या होत्या. मला अजूनही त्यांची ही खेळी आठवते. तसेच आबिद अली यांनी विजयी धावा केल्या होत्या. मला अजूनही या सर्व गोष्टी आठवणीत आहेत. त्यांनी एक चौकार मारून भारतीय संघाला विजयी केले होते. तेव्हा आबिद स्टंप काढायचे विसरून गेले होते. ज्यावेळी त्यांना अर्ध्या रस्त्यात गेल्यावर आठवले, तेव्हा ते पुन्हा स्टंप घेण्यासाठी माघारी आले. मात्र, तोपर्यंत तेथील स्टंप गायब झाले होते,” असेही शास्त्री म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
–ज्याची भिती तेच झाले! अफगाणिस्तान वि. पाकिस्तान वनडे मालिका अनिश्चित काळासाठी स्थगित
–भारीच की! वॉर्नर कुटुंबात ‘वाथी कमिंग’चे पसरले वारे, बापासह लेकींनीही धरला ठेका
–आपला भिडूच वर्णद्वेषाचा बळी ठरल्याने जो रूट दु:खी; म्हणाला, ‘त्याच्यासोबत असे होताना पाहणे…’