---Advertisement---

आपला भिडूच वर्णद्वेषाचा बळी ठरल्याने जो रूट दु:खी; म्हणाला, ‘त्याच्यासोबत असे होताना पाहणे…’

On: मंगळवार, ऑगस्ट 24, 2021 8:55 PM
---Advertisement---

क्रिकेट हा कौशल्यावर आधारित असा खेळ आहे, ज्यामध्ये खेळाडू आपल्या कौशल्याच्या आधारे चांगले प्रदर्शन करत असतो. मात्र काही वेळेस या खेळात वर्णद्वेषासारखे किस्से घडत असतात. जे क्रिकेटसारख्या खेळामध्ये निंदनीय आहे. अशाच एका घटनेबाबत इंग्लंडचा कर्णधार जो रूटने सोमवारी (२३ ऑगस्ट) वक्तव्य केले. त्याचा यॉर्कशायर संघाचा माजी संघ सहकारी अजीम रफीकसोबत क्रिकेट क्लबकडून वर्णद्वेष झाल्याचे आरोप केल्यानंतर त्याने दुःख व्यक्त केले. रूटने अशा घटनांपासून जागरुकता निर्माण करण्यासाठी याच्याशी संबंधित लोकांना आग्रह केला आहे.

इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाचा माजी कर्णधार रफिक मागील वर्षी एका मुलाखतीत बोलताना म्हणाला होता. “यॉर्कशायर संघाकडून २००७-२०१८ दरम्यान खेळताना मला वाळीत टाकल्यासारखे जाणवत होते.”

याबाबत बोलताना रूट म्हणाला, “क्रिकेटमध्ये वर्णद्वेषाला दूर करण्यासाठी अजूनही खूप काही काम करणे बाकी आहे. मला अशा गोष्टींवर जास्त चर्चा करायची नाही, ज्यांना मी पाहिले नाही. मात्र, संघाच्या पूर्व सहकाऱ्यासोबत जो की माझा मित्र देखील आहे. त्याच्यासोबत असे होताना पाहणे खूप दुःखदायक आहे. त्यामुळे मला असे वाटते की क्रिकेटमध्ये अजूनही खूप काही करणे गरजेचे आहे.”

रफिकने २०२० च्या डिसेंबर महिन्यात वर्णद्वेष आणि भेदभाव केल्याबाबत एक तक्रार दाखल केली होती. त्यावेळी ३० वर्षीय रफिकने याबाबत बोलताना सांगितले होते की, “क्रिकेट क्लबमध्ये मिळालेल्या वागणुकीमुळे मी मानसिकरित्या प्रचंड अस्वस्थ होतो. मला खूप अडचणींना सामोरे जावे लागले. यामुळे मी खूप नैराश्यात गेलो होतो. तसेच यादरम्यान मला आत्महत्या करण्याचा देखील विचार आला होता.”

यानंतर यॉर्कशायर क्लबकडून रफिकसोबत झालेल्या वर्णद्वेष आणि भेदभावाबाबत माफीनामा प्रसिद्ध करण्यात आला होता, ज्यामध्ये त्यांनी रफिकची माफी देखील मागितली होती.

महत्त्वाच्या बातम्या –
“कारकिर्दीत मला असे कधीच जाणवले नव्हते”, बुमराहच्या बाउंसरबाबत अँडरसनने सोडले मौन
रवी शास्त्रींनंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, माजी पाकिस्तानी क्रिकेटरचे मत
इंग्लंडच्या ‘प्लेइंग ११’ मध्ये व्हावेत ‘हे’ फेरबदल, माजी इंग्लिश क्रिकेटरने निवडला संघ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---