ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेविड वॉर्नर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो अनेकदा त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचे, पत्नीचे आणि मुलींचे मजेदार व्हिडिओ शेअर करतो. त्याने नुकताच पोस्ट केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. डाव्या हाताच्या या फलंदाजाने मंगळवारी (२४ ऑगस्ट) आपल्या मुलींचा “वाथी कमिंग” या गाण्यावर नाचतानाचा व्हिडिओ शेअर केला.
काही दिवसांपूर्वी वॉर्नरने याच गाण्यावर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता. इशा गुहा आणि राशीद खान यांच्यासह चाहत्यांनी आणि त्याच्या हितचिंतकांनी देखील या व्हिडिओवर चांगला प्रतिसाद दिला होता. यानंतर नुकताच त्याने आपल्या मुलींचा या गाण्यावर थिरकतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
समोर ठेवलेल्या टॅबवर वाथी कमिंग गाणे वाजताना दिसत आहे. यावर त्याच्या मुली गाणे पाहत नाचताना दिसत आहेत. वॉर्नरने हा व्हिडिओ शेअर करत ‘माझ्या मुलींना वाथी कमिंग गाण्याचे वेड लागले आहे,’ असे कॅप्शन दिले आहे.
डेविड वॉर्नर आयपीएल २०२१ च्या उर्वरित हंगामात खेळणार
सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर डेविड वॉर्नरने अलीकडेच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी त्याच्या उपलब्धतेची पुष्टी केली होती. संयुक्त अरब अमिरातीमध्ये १९ सप्टेंबरपासून ही स्पर्धा पुन्हा सुरू होईल.
वॉर्नरने सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीचा कर्णधार म्हणून हंगामाची सुरुवात केली होती. पण संघाच्या खराब कामगिरीमुळे पहिल्या टप्प्याच्या मध्यातच त्याची जागा केन विलियम्सनने घेतली. या डावखुऱ्या फलंदाजाला पहिल्या टप्पायत फारशी चांगली फलंदाजी कामगिरीही करता आली नव्हती. त्याने ६ सामन्यात ३२ च्या सरासरीने केवळ १९३ धावा केल्या आहेत.
सनरायझर्स हैदराबाद सध्या सात सामन्यांत केवळ एका विजयासह गुणतालिकेच्या तळाशी आहे. ते १२ सप्टेंबरला दुबईत दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पुन्हा मोहीम सुरू करतील.
महत्त्वाच्या बातम्या-
“कारकिर्दीत मला असे कधीच जाणवले नव्हते”, बुमराहच्या बाउंसरबाबत अँडरसनने सोडले मौन
रवी शास्त्रींनंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, माजी पाकिस्तानी क्रिकेटरचे मत
संघसहकाऱ्याची गोलंदाजी पाहून बाबर आझमही झाला घायाळ; प्रशंसा करत म्हणाला, ‘हाय हाय मजे’