भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील अखेरचा निर्णायक सामना अहमदाबाद येथे खेळला गेला. भारतीय संघाने या सामन्यात ३६ धावांनी विजय मिळवत मालिका आपल्या नावे केली. मात्र, याचवेळी भारतीय क्रिकेटमध्ये यापूर्वी कधीही न घडलेली घटना भारतातील दोन वेगवेगळ्या शहरात घडली.
असे प्रथमच झाले
भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे मालिकेतील निर्णायक सामना खेळला गेला. भारताने इंग्लंडला ३६ धावांनी पराभूत करत मालिकेवर नाव कोरले. त्याचबरोबर दुसरीकडे, भारतीय महिला या दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध तीन टी२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. हा सामना लखनऊ येथील अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर खेळला गेला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाला ८ बळी राखून नमवले. हे दोन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता चालू झाले होते
यासोबतच भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कधीही न घडलेला एक अजब योगायोग आज घडून आला. २०१६ चा टी२० विश्वचषक सोडल्यास भारतीय महिला संघ व भारतीय पुरुष संघ यांनी एकाच दिवशी एकाचवेळी टी२० सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. २००६ सालापासून भारतीय पुरुष संघ टी२० क्रिकेट खेळत आहे.
भारतीय संघाचा विजय तर महिलांचा दारुण पराभव
पुरुष संघाने इंग्लंड संघाला ३६ धावांनी पराभूत करत पाच सामन्यांची मालिका आपल्या नावे केली. भारताने कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद ८० व उपकर्णधार रोहित शर्माच्या ६४ धावांच्या जोरावर २२४ धावा उभारल्या होत्या. प्रत्युत्तरात, इंग्लंडसाठी जोस बटलर व डेव्हिड मलान यांनी दुसऱ्या गड्यासाठी १३० धावा जोडल्या. मात्र, त्यानंतर कोणीही मोठी खेळी करू शकले नाही व भारताने विजय संपादन केला.
दुसरीकडे, भारतीय महिला संघाला तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी करत हरलीन देओलच्या अर्धशतकाच्या जोरावर १३० धावा काढल्या होत्या. परंतु, दक्षिण आफ्रिका संघासाठी एनिका बॉशने अर्धशतक झळकावून संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघाचा ‘अठरावा प्रताप’! अशी कामगिरी करणारा एकमेव संघ बनला भारत
विराटने सर केले विक्रमाचे आणखी एक शिखर, ‘या’ यादीत पोहोचला अव्वलस्थानी
मलानचा विश्वविक्रम! ६५ वी धाव घेताच कोहली, बाबर आझमला टाकले मागे