---Advertisement---

सुपर फोरमध्ये भारताची दिमाखात एन्ट्री! नेपाळला नमवल्यानंतर पाकिस्तानशी करणार दोन हात

On: सोमवार, सप्टेंबर 4, 2023 11:43 PM
Shubman Gill Rohit Sharma
---Advertisement---

भारत आणि नेपाळ यांच्यात सोमवारी (4 सप्टेंबर) रोमांचक सामना पाहायला मिळाला. पावसाने या सामन्यात व्यत्यय आणला. पण रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामीवीर जोडीने चाहत्यांच्या मनोरंजनात कमी पडू दिली नाही. या दोघांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर भारताने 20.1 षटकांमध्ये एकही विकेट न गमावता सामना नावावर केला. या विजयासोबतच भारतीयसंघ आशिया चषकाच्या सुपर फोर फेरीसाठी पात्र ठरला.

आशिया चषक 2023 चा हा पाचवा सामना होता. नेपाळने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीचा केली. नेपाळचा संपूर्ण संघ 48.2 षटकांमध्ये 230 धावांवर सर्वबाद झाला. भारताला विजयासाठी 50 षठकात 231 धावा हव्या होत्या. पण दोन षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. पाऊस काही वेळ चालल्यामुळे सामना 50 षटकांचा होणे शक्य नव्हते. अशात पंचांनी डकवर्थ लुईस नियमाचा वापर करत भारताला 23 षटकांमध्ये 145 धावांचे लक्ष्य दिले. भारताने हे लक्ष्य एकही विकेट न गमावता गाठले. कर्णधार रोहित शर्मा () याने 74 धावा केल्या. तर शुबमन गिल () याने 67 धावांची अप्रतिम खेळी केली. भारतीय संघ या सामन्यातील विजयानंतर पाकिस्तानसोबत 10 सप्टेंबर रोजी पाकिस्तानसोबत खेळेल. (India’s entry in the Super Four! After defeating Nepal, they will play with Pakistan)

भारत विरुद्ध नेपाळ सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन- 
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

नेपाळ – असिफ शेख, कुशल भुर्टेल,रोहित पौडेल (कर्णधार), भीम, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण छेत्री, ललित राजबंशी.

महत्वाच्या बातम्या – 
नेपाळकडून भारतीय गोलंदाजांची धुलाई! सुपर फोरसाठी भारतापुढे ठेवले मोठे लक्ष्य
बीसीसीआय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पाकिस्तानमध्ये दाखल, खास सामन्यासाठी लावणार स्टेडियममध्ये उपस्थिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---