भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांची टी20 मालिका नुकतीच खेळली गेली. या मालिकेत भारताने बांगलादेशवर वर्चस्व गाजवत 3-0 ने मालिका आपल्या खिशात घातली. आता भारतीय संघ आगामी न्यूझीलंड संघासोबत 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील झाली आहे. पण न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेपूर्वीच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) कोहलीच्या फाॅर्मबद्दल त्याला पाठिंबा दिला आहे.
विराट कोहलीबद्दल (Virat Kohli) बोलताना गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला, “पहा, विराटबद्दल माझे मत नेहमीच स्पष्ट राहिले आहे, की तो एक जागतिक दर्जाचा क्रिकेटर आहे. त्याने दीर्घकाळ उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पदार्पणाच्या वेळी त्याला जितकी धावा करण्याची भूक लागली होती. त्याची ही भूक कायम आहे. मला खात्री आहे की त्याला न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत धावा करण्याची भूक लागेल आणि बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीमध्ये (Border Gavaskar Trophy) सुद्धा तो अशीच कामगिरी करेल.”
पुढे बोलताना गंभीर म्हणाला की, “कोणत्याही खेळाडूला एका खराब सामन्यामुळे किंवा मालिकेच्या आधारावर ठरवता कामा नये. तुम्ही प्रत्येक सामन्यानंतर खेळाडूंना योग्य ठरवत नाही. जर तुम्ही प्रत्येक सामन्यानंतर खेळाडूंना योग्य ठरवत असाल तर ते त्यांच्यासाठी योग्य नाही.”
गौतम गंभीरने (Gautam Gambhir) इतर खेळाडूंबद्दलही सांगितले. तो म्हणाला, “प्रत्येकाचा दररोज सर्वोत्तम दिवस असतो असे नाही. मला वाटते की आमच्या संघात ज्या प्रकारचे वातावरण आहे, आम्ही आमच्या खेळाडूंना पाठिंबा देत राहू. माझे काम सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हनची निवड करणे आहे.”
भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 2 सामन्यांची कसोटी मालिकाही खेळली गेली. या मालिकेत भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) मोठी खेळी खेळण्यात यशस्वी ठरला नाही. त्याने बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेत 50 धावांचा आकडा देखील गाठला नाही. या मालिकेत त्याची सर्वोच्च धावसंख्या 47 धावा राहिली.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तान येणार आमनेसामने, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूकडे नेतृत्व; या दिवशी होणार रोमांचक लढत
भारत, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू बाबर आझमच्या समर्थनार्थ, जाणून घ्या कोण काय म्हणालं?
फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सलग चौथं शतक ठोकलं, मात्र अद्यापही भारतीय संघात जागा मिळाली नाही!