भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी (मोटेरा) स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकी गोलंदाजांचा बोलबाला होता. भारतीय संघाकडून लोकल बॉय अक्षर पटेलने ६ गडी बाद केले आणि आर अश्विनला ३ तर ईशांत शर्माला १ गडी बाद करण्यात यश आले. अशात या मैदानाच्या उद्घाटनासाठी आलेले प्रमुख पाहुणे भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी एका भारतीय फलंदाजाकडून दुहेरी शतक झळकावण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले होते. राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांच्या हस्ते या स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले. यासोबतच केंद्रीय गृहमंत्री शहा देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात जनतेला संबोधित करत असताना शहा यांनी आशा व्यक्त केली की, “चेतेश्वर पुजारा या सामन्यात दुहेरी शतक झळकावेल आणि भारतीय संघाला सामना देखील जिंकवून देईल.”
तसेच पुढे ते म्हणाले, “हे स्टेडियम जवागल श्रीनाथसाठी खूप खास आहे. त्यांनी याच मैदानावर दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध ६ गडी बाद केले होते. तसेच याच मैदानावर कपिल देव यांनी रिचर्डचा विक्रम मोडून काढला होता. सचिनने आपल्या कारकिर्दीतील २० वर्ष याच मैदानावर पूर्ण केली होते. याबरोबरच सुनील गावसकर यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा करण्याचा विक्रम देखील याच मैदानावर केला होता. मी आशा व्यक्त करतो की, पुजारा या मैदानावर दुहेरी शतक करत भारतीय संघाला विजय मिळवून देईल.”
पुजारा शून्यावर परतला माघारी
इंग्लंड संघाने पहिल्या डावात ११२ धावा केल्या आहेत. यानंतर फलंदाजीला आलेल्या रोहित शर्माने अर्धशतकीय खेळी केली आहे. तसेच शूबमन गिल अवघ्या ११ धावा करत माघारी परतला. तसेच अमित शहा यांनी द्विशतक झळकावण्याची अपेक्षा केलेल्या पुजाराने खाते ही नाही उघडले. ४ चेंडूत शून्य धावांवर जॅक लीचच्या हातून तो पायचित झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२१ पुर्वी देवदत्त पड्डीकलची वादळी खेळी, १४ चौकारांसह चोपल्या तब्बल १५२ धावा
ओ भाई, जरा रुको! अचानक चाहता मैदानावर धावत आल्याने घाबरला विराट कोहली, व्हिडिओची रंगली चर्चा