सप्टेंबर २०१७ ते डिसेंबर २०१७ दरम्यान भारत खेळणार २३ सामने
भारताच्या होम सीझनमध्ये केरळ आणि आसाम मधील दोन नवीन स्टेडियम करणार आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन
बीसीसीआयच्या टूर्स आणि फिक्स्चर्स कमिटीची बैठक आज कोलकाता येथे पार पडली. या बैठकीनंतर हे स्पष्ट झाले आहे की भारत सप्टेंबर २०१७ ते डिसेंबर २०१७ पर्यंत २३ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे
२०१७ मध्ये भारताच्या या मालिका होणार…
सप्टेंबर-ऑक्टोबर: ५ एकदिवसीय आणि ३ टी -२० सामना विरुद्ध ऑस्ट्रेलिया
ऑक्टो-नोव्हें: ३ एकदिवसीय आणि ३ टी २० विरुद्ध न्यूझीलँड
नोव्हेंबर-डिसें: ३ एकदिवसीय, ३ कसोटी आणि ३ टी -२० श्रीलंका
जानेवारी २०१८ मध्ये भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरू होण्याची शक्यता आहे.
या बरोबरच चाहत्यांसाठी एक खुश खबर म्हणजे दोन नवीन ठिकाणी आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातील. आसाममधील बासारपारा आणि त्रिवेंद्रममधील ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये अनुक्रमे ऑस्ट्रेलिया व श्रीलंका यांच्यादरम्यान टी -२० सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
भारतीय संघ सध्या तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन टी -20 सामने खेळण्यासाठी श्रीलंकेत आहे. या मालिकेनंतर विराट कोहली आणि टीमला छोटा ब्रेक मिळेल.