आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) आज(22 जानेवारी) 2018 या वर्षातील पुरस्कार जाहिर केले आहेत. या पुरस्कारांमध्ये विराट कोहलीचाच बोलबाला राहिला असून त्याने आयसीसीचे तीनही महत्त्वाचे पुरस्कार पटकावले आहेत.
विराटला आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार तसेच 2018 या वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू आणि कसोटीपटू असे दोन पुरस्कारही विराटने पटकावले आहेत.
आयसीसीने 2018 चे वनडे आणि कसोटीचा 11 जणांचा सर्वोत्तम संघही जाहीर केला असून या दोन्ही संघाचा कर्णधारही विराटला करण्यात आले आहे.
विराटला 2017 चाही आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा आणि सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला होता.
तसेच 2016 चा आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार फिरकी गोलंदाज आर अश्विनला मिळाला होता. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी हा पुरस्कार भारतीय खेळाडूला मिळाला आहे.
आयसीसीच्या पुरस्कारांमध्ये नेहेमीच भारतीय क्रिकेटपटूंचे वर्चस्व दिसून येते. 2004 पासून 2018 पर्यंत भारताच्या 4 क्रिकेटपटूंनी आयसीसी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला आहे. यात विराट कोहलीनेच सलग दोन वेळा हा पुरस्कार मिळवला आहे.
अश्विनच्या आधी 2004 मध्ये राहुल द्रविड, 2010 मध्ये सचिन तेंडुलकरने आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळवला आहे.
हे आहेत 2004 ते 2017 पर्यंतचे आयसीसी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू:
2004 – राहुल द्रविड
2005 – जॅक कॅलिस/ अँड्र्यू फ्लिंटॉफ
2006 – रिकी पॉन्टिंग
2007 – रिकी पॉन्टिंग
2008- शिवनारायण चंद्रपॉल
2009 – मिशेल जॉन्सन
2010 – सचिन तेंडुलकर
2011 – जोनाथन ट्रॉट
2012 – कुमार संगकारा
2013 – मायकल क्लार्क
2014 – मिशेल जॉन्सन
2015 – स्टीव्ह स्मिथ
2016 – आर अश्विन
2017 – विराट कोहली
2018 – विराट कोहली
महत्त्वाच्या बातम्या-
–विराट कर्णधार असलेला आयसीसी २०१८चा सर्वोत्कृष्ठ कसोटी संघ जाहीर, भारताच्या तीन खेळाडूंचा सहभाग
–आयसीसी पुरस्कारात बाजी मारणाऱ्या किंग कोहलीने केले हे खास ५ विक्रम





