भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्म्रीती मानधनाला जशी मैदानावर आक्रमक फटकेबाजीची कला आवगत आहे. तशीच मैदानाबाहेर तीला पियानो वाजवण्याची कलाही अवगत आहे. तिचा पियानो वाजवण्याचा व्हिडिओ भारतीय महिला संघातील तिची संघसहकारी जेमिमा रोड्रीगेजने शेअर केला आहे.
स्म्रीतीला काल(31 डिसेंबर) आयसीसीचा 2018 या वर्षाचा सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा रचल हेहो फ्लिंट पुरस्कार जाहिर झाला आहे. त्याचबरोबर तिला सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटपटूचाही पुरस्कार मिळाला आहे.
याबद्दल अभिनंदन करताना जेमिमाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ‘कल हो ना हो’ या गाण्यावर स्म्रीती पियानो वाजवताना तर जेमिमा गिटार वाजवताना दिसत आहे.
या व्हिडिओला कॅप्शन देताना जेमिमाने कॅप्शन दिले आहे की, ‘आयसीसीचा 2018 या वर्षाचा सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा आणि सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन स्म्रीती.’
‘ही फक्त सुरुवात आहे. कारण तूला लवकरच ‘न्यू म्यूझीक टॅलेंट’ हा फिल्मफेअर पुरस्कारही मिळणार आहे.’
https://www.instagram.com/p/BsC6rh3H8vC/
स्म्रीतीने 1 जानेवारी 2018 ते 31 जानेवारी 2018 या वर्षात 12 वनडे सामन्यात 66.90 च्या सरासरीने 669 धावा केल्या आहेत. तसेच 25 टी20 सामन्यात 28.27 च्या सरासरीने 622 धावा केल्या आहेत.
विंडीजमध्ये पार पडलेल्या महिला टी20 विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीत पोहचवण्यात तिने मोलाची भूमीका पार पाडली होती. तिने या स्पर्धेत 5 सामन्यात 178 धावा केल्या होत्या. ती सध्या आयसीसी महिला वनडे क्रमवारीत 4थ्या तर टी20 क्रमवारीत 10 व्या स्थानावर आहे.
मानधना ही आयसीसीची वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू ठरणारी दुसरीच भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. तिच्याआधी झुलन गोस्वामीला हा पुरस्कार 2007 मध्ये मिळाला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–वडीलांच्या निधनानंतरही तो खेळाडू खेळत होता संघासाठी…
–क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या २०१८ वनडे संघाचा विराट कोहली झाला कर्णधार
–नववर्षातील असाही एक योगायोग जो आहे केवळ सचिन कोहलीच्या नावावर