भारतीय संघाचे माजी दिग्गज अष्टपैलू सलीम दुर्रानी यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. ते त्यांचा भाऊ जहांगीर दुर्दानींसोबत गुजरातच्या जामनगरमध्ये राहत होते. माध्यमांतील वृत्तांनुसार यावर्षी जानेवारी महिन्यात दुर्रानी यांना दुखापत झाली होती. दुखापतीत मांडीचे हाड मोडल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील केली गेली होती.
सलीन दुर्रानी (Salim Durrani) एक आक्रामक डावखुरे फलंदाज आणि डावखुरे फिरकी गोलंदाज होते. त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 29 कसोटी सामने खेळले. यामध्ये 25.4च्या सरासरीने त्यांनी 1202 धावा आणि 75 विकेट्स घेतल्या. यात एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश होता. सलीम यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 170 सामन्यांमध्ये 8545 धावा आणि 484 विकेट्स घेतल्या होत्या. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यांनी 3 सामन्यांमध्ये 34 धावा केल्या, तर 4 विकेट्सही घेतल्या. भारतीय संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दुर्रानींच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.
Easily one of the most colourful cricketers of India – Salim Durani.
Rest in Peace. ॐ शांति 🙏 pic.twitter.com/d5RUST5G9n
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) April 2, 2023
भारतीय संघाने 1971 मध्ये वेस्ट इंडीजमध्ये पहिला विजय मिळवला होता. या विजयात सलीम दुर्रानींची भूमिका महत्वाची राहिली होती. त्यानी या सामन्यात गॅरी सोबर्स आणि क्लाईव्हा लाईड यांना शून्यावर बाद केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मार्क इधर है! पाच वर्षानंतर आयपीएल खेळायला उतरलेल्या ‘वेगवान’ वूडने मोडला 11 वर्षांपूर्वीचा विक्रम
मैदानावर न उतरताही दिल्लीसाठी ‘या’ भूमिकेत दिसणार रिषभ! स्वतः ट्विट करत दिली माहिती