भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या टी20 एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी (2 ऑगस्ट) रोजी खेळला गेला. कोलंबोच्या मैदानावर हा सामना रंगला होता. दोन्ही संघामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली पण सामना शेवटी टाय झाला. तत्पूर्वी या सामन्यात भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) 24 धावा करुन तंबूत परतला. परंतू कोहलीनं त्याच्या नावावर एका रेकाॅर्डची नोंद केली. तो द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे.
आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहलीनं 21,000 धावा पूर्ण केल्या आहेत. या यादीत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) 22,960 धावांसह अव्वल स्थानावर आहे. 24 धावांच्या खेळीसह विराट कोहलीन (Virat Kohli) जॅक कॅलिसला मागे टाकले. कोहली द्विपक्षीय मालिकेत 21,000 धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. कुमारा संगकारा 20,154 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर 231 धावांचं लक्ष ठेवून मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली होती. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 12.4 षटकात 75 धावांची भागीदारी केली. यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यात चौथ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी झाली. दोन्ही खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होते आणि दोघेही चांगली खेळी खेळणार असल्याचे दिसत होतं. पण वानिंदू हसरंगनं विराट कोहलीला एलबीडब्ल्यू आऊट करून ही भागीदारी तोडली. कोहलीनं 32 चेंडूत 24 धावा केल्या, ज्यात 2 चौकारांचा समावेश होता. कोहलीपाठोपाठ श्रेयस अय्यर (23) ही तंबूत परतला.
श्रेयस बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 132 धावा होती. येथून केएल राहुल (KL Rahul) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांनी हुशारीनं फलंदाजी केली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. केएल राहुल 31 धावा करून वानिंदू हसरंगाचा बळी ठरला. तर अक्षर पटेल (33) याला श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकानं बाद केलं. श्रीलंकेनं अंतिम टप्प्यात धारदार गोलंदाजी केली आणि सामना टाय करण्यात यशस्वी राहिले.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतानं दोनच वनडे विश्वचषक जिंकले, मग जर्सीवर तीन स्टार्स कसे?
अवघ्या 4 सामन्यात गौतम गंभीरनं केली माजी प्रशिक्षकाच्या रेकाॅर्डची बरोबरी
पदकाची आशा वाढली! दीपिका कुमारीची क्वार्टर फायनलमध्ये एंट्री, भजन कौरच्या हाती निराशा