---Advertisement---

मेगा लिलावापूर्वी हार्दिकचा पत्ता कट! मुंबई इंडियन्स रोहित-सूर्यकुमारसह या 4 खेळाडूंना कायम ठेवणार

On: शनिवार, ऑगस्ट 3, 2024 11:02 AM
---Advertisement---

काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या वानखेडे येथील कार्यालयात आयपीएल अधिकारी आणि संघ मालक यांच्यात महत्तवपूर्ण बैठक झाली. या बैठकीला काही संघांचे मालक बीसीसीआय कार्यालयात उपस्थित होते तर काहींनी व्हिडिओ काॅल द्वारे या बैठकीला सहभाग नोंदवला. या बैठकीतून अनेक धक्कादायक बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र, यादरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पशी संबंधित आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार मुंबई इंडियन्स त्यांचा कर्णधार हार्दिक पांड्याला सोडणार असल्याची बातमी समोर येत आहे. वास्तविक मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 पूर्वी हार्दिक पांड्याला पुन्हा आपल्या संघात सामील केले होते. तसेच फ्रँचायझीने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून या स्टार अष्टपैलू खेळाडूला दिले होते. तरी देखील संघाला आश्चर्यकारक कामगिरी करण्यात यश आले नाही. आणि प्लेऑफमध्येही स्थान मिळवू शकला नाही. आता मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला सोडणार असल्याची बातमी आहे.

आयपीएलच्या नियमांनुसार दर तीन वर्षांनी मेगा लिलाव आयोजित केला जातो. यावेळी डिसेंबरमध्ये पुन्हा मेगा लिलाव होणार आहे. अशा परिस्थितीत, सर्व 10 संघांना प्रत्येकी चार खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी असेल. मात्र, यावेळी कायम ठेवलेल्या खेळाडूंची संख्या वाढू शकते, असेही वृत्त आहे. याबाबत बीसीसीआय किंवा आयपीएलने अद्याप काहीही सांगितलेले नाही. पण आता पाच खेळाडूंना कायम ठेवता येईल असा दावा अहवालात केला जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सला रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना कोणत्याही किंमतीत सोबत ठेवायचे आहे. अशा परिस्थितीत फ्रँचायझी हार्दिक पांड्याला सोडणार आहे, कारण सूर्यकुमार आता टी20 फॉरमॅटमध्ये देशाचा कर्णधार आहे. अशा परिस्थितीत फ्रँचायझी आपल्या संघाची कमान त्याच्याकडे सोपवू शकते. सूर्याच्या नेतृत्वाखाली रोहितलाही खेळता येईल. मुंबई इंडियन्स आयपीएल 2025 साठी सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवू शकते, असे या अहवालात म्हटले जात आहे.

हेही वाचा-

‘मिरॅकल गर्ल’ मनू भाकर पदकांच्या ऐतिहासिक हॅट्ट्रिकच्या जवळ, लक्ष्यही पहिल्या मेडलपासून एक पाऊल दूर
रोहित शर्माने अर्धशतक झळकावून रचला इतिहास; या महान विक्रमात सचिन तेंडुलकरची बरोबरी!
“हातातला सामना गमावला”, रोहित शर्मानं या खेळाडूवर फोडलं खापर, पाहा कर्णधार नेमकं काय म्हणाला?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---