कोरोना व्हायरसमुळे आंंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक बिघडले आहे. आता यामध्ये सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात भारताची इंग्लंडविरुद्धची मर्यादित षटकांची मालिकाही शुक्रवारी (७ ऑगस्ट) स्थगित केली आहे. दोन्ही संघांना ३ वनडे आणि ३ आंंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळायचे होते. आता ही मालिका पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या कसोटी मालिकेनंतर खेळण्यात येऊ शकते.
ही मालिका ऑस्ट्रेलियामध्ये १८ ऑक्टोबरपासून होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या तयारीसाठी महत्त्वाची होती. परंतु कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता टी२० विश्वचषक स्पर्धाही स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएलसाठी कालावधी (विंडो) उपलब्ध झाला आहे. आता पुढील महिन्यात १९ सप्टेंबरपासून १० नोव्हेंबरदरम्यान आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन केले जाणार आहे.
बीसीसीआयने (BCCI) एका निवेदनात म्हटले की, “बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून (England Cricket Board) २०२१ चे वेळापत्रक पाहिले जाईल. ज्यामध्ये जानेवारीच्या शेवटीपासून मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत इंग्लंड संघाला भारताचा पूर्ण दौरा करता येईल. भारतीय संघाला २०२१ च्या उन्हाळ्यात इंग्लंडचा कसोटी दौराही करायचा आहे.”
बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी म्हटले, “क्रिकेट सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय आणि ईसीबी तारखा ठरविण्याच्या प्रक्रियेत आहेत. भारत आणि इंग्लंड संघातील मालिकेवर सर्वांचे लक्ष असते.”
पुढील वर्षी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतात इंग्लंडविरुद्ध ५ ऐवजी ४ कसोटी मालिका खेळण्याची शक्यता आहे. ईसीबीचे सीईओ टॉम हॅरिसन (Tom Harrison) यांनी म्हटले की, “भारत आणि इंग्लंड (India and England) दरम्यान आंतरराष्ट्रीय वेळापत्रकाचा महत्त्वाचा भाग आहे. हा दौरा किती लवकर आटोपता येईल, हे आम्ही बीसीसीआयसोबत मिळून पाहू.”
भारतीय संघाने मार्च महिन्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी२० मालिकाही मार्च महिन्यात कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
-कुलदीप यादवच्या वर्कआउटचा व्हिडिओ पाहून फॅन्स झाले हैराण; मात्र धवनने केले ट्रोल
-२०२२ च्या विश्वचषकात खेळणार का? झुलन गोस्वामी म्हणाली…
-‘सचिनला त्रिफळाचीत करणारा माझा तो चेंडू वॉर्नपेक्षाही भारी,’ पाहा कोण म्हणतंय…
ट्रेंडिंग लेख-
-असे ५ खेळाडू जे आयपीएलच्या लिलावात ठरले महागडे, पण मैदनात मात्र झाले फ्लॉप…
-५ असे खेळाडू ज्यांना आयपीएलच्या लिलावात मिळाली कमी रक्कम, परंतु संघासाठी ठरले मॅच विनर
-‘जेंटल जायंट’ या नावाने प्रसिद्ध झालेला अँगस फ्रेझर