क्रिकेटच्या विश्वात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम केले आहेत. त्याचबरोबर सचिन तेंडुलकर आता स्वयंपाक घरात देखील आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. तो क्रिकेटमधील निवृत्तीनंतर आता स्वयंपाकात आपले कौशल्य दाखवत आहे. त्याचा स्वयंपाक घरात पदार्थ बनवत असतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
सचिन तेंडुलकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक नाव न सांगता एक पदार्थ करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ कोण शूट करीत आहे किंवा सचिनने काय शिजवले हे स्पष्ट झाले नाही, परंतु हा पदार्थ शिजवत असताना सचिन त्याबद्दल खूप खूष दिसत होता. तो म्हणाला की, ‘मी सर्वांना हा पदार्थ करून आश्चर्यचकित करणार आहे. पण मी काय शिजवतोय हे कोणालाही माहित नाही आणि मलाही माहिती नाही. परंतु काळजी करण्याची काही गोष्ट नाही.’
सचिन व्हिडिओमध्ये भाष्य करण्याच्या शैलीत म्हणाला की, ‘आता फलंदाज लयीमध्ये आला आहे, त्यामुळे आता गोलंदाजांना आपला जीव वाचवावा लागणार आहे. त्यांच्यावर चारी बाजूंनी हल्ले होत आहेत. मी या कलेमध्ये पारंगत झालो आहे. मला माहिती आहे काय करायचे आहे. यास थोडा वेळ लागेल परंतु आम्ही तिथेच आहोत.’
https://www.instagram.com/p/CRHMxx_gmdM/
सचिन 2013 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मित्रांबरोबर सुट्टी घालणे, गोल्फ खेळणे, स्वयंपाक करणे, बागकाम करणे, मुलांसमवेत वेळ घालवणे यासारख्या सर्व प्रकारच्या कार्यात स्वत: ला व्यस्त ठेवत असतो. कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा सचिन तेंडुलकरला मार्चमध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज दरम्यान क्रिकेटच्या मैदानावर शेवटचे पहिले होता. या स्पर्धेत त्याने भारताचे नेतृत्व करताना स्पर्धेचे विजेतेपद संघाला जिंकून दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ माजी खेळाडूंना मिळाली बंगाल क्रिकेटच्या कोचिंग स्टाफमध्ये संधी, व्हीव्हीएस लक्ष्मणचाही समावेश
ब्रदरली चॅलेंज! जेव्हा पंड्या बंधू जीममध्ये देतात एकमेकांना आव्हान, पाहा काय लागला निकाल
टी२० विश्वचषकासाठी बड्या खेळाडूने निवडली भारताची प्लेइंग इलेव्हन, धवनला दाखवला बाहेरचा रस्ता