मापुसा ( गोवा ), २४ जानेवारी २०२४ : गोव्यातील मापुसा येथील पेडेम इनडोअर स्टेडियमवर बुधवारी पात्रता फेरीचा शेवटचा सामना जिंकून भारताच्या नित्या मणीने WTT Star Contender Goa २०२४ च्या मुख्य फेरीत प्रवेश केला.
चेन्नईच्या नित्याने महिला एकेरीच्या पात्रता फेरीतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या टीन-टीन हो हिचा ३-२ ( ११-७, ६-११, ५-११, ११-९, ११-७ ) असा रोमहर्षक विजय मिळवून मुख्य फेरीत प्रवेश पक्का केला. मुख्य फेरीला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे.
टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) च्या
मार्गदर्शनाखाली स्तूपा स्पोर्ट्स अॅनालिटिक्स आणि अल्टिमेट टेबल टेनिस यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला एकेरीच्या अन्य लढतीत अहिका मुखर्जीला १-३ ( ११-५, ९-११, ६-११, ६-११) अशा फरकाने तुर्कीच्या सिबेल एल्टींकायाकडून हार पत्करावी लागली, तर स्पेनच्या सोफीया झँगने ३-१ ( ११-५, ६-११, १४-१२, ११-०) अशा फरकाने दिव्या चितळेवर विजय मिळवला आणि मुख्य फेरीत प्रवेश निश्चित केला. सुतिर्था मुखर्जीलाही १-३ ( ८-११, ७-११, १२-१०, ४-११) अशा फरकाने हान्ना रियूकडून हार पत्करावी लागल्याने स्पर्धेबाहेर जावे लागले.
दरम्यान, पुरुष एकेरीतही भारताच्या साथियन ज्ञानसेकरनची अटीतटीच्या सामन्यात फ्रान्सच्या व्हिन्सेंट पिकार्डकडून दुसऱ्या फेरीत २-३ ( ७-११, ११-७, ६-११, ११-७, ८-११) अशी हार झाली. सेनेगलच्या इब्राहिम डिएवने एकहाती लढतीत मानव ठक्करचा ३-० ( १२-१०, ११-६, ११-७) पराभव केला.
जीत चंद्र आणि पायस जैन यांनी पुरुष दुहेरी गटात मुख्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी यशांश मलिक आणि अभिनंद प्राधिवादी यांच्यावर ३-१ ( ११-१३, ११-७, १२-१०, ११-४ ) असा सहज विजय मिळवला. सायली वाणी आणि तनिशा कोटेचा यांनी महिला दुहेरीच्या पात्रता फेरीतील दुसऱ्या सामन्यात सुहाना सैनी आणि यशस्विनी घोरपडे या भारतीय जोडीचा ३-१ ( ९-११, ११-९, ११-६, ११-६) पराभव केला.
मिश्र दुहेरीत मानुष शाह आणि दिया चितळे यांनी पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्नेहित सुरवज्जुला आणि श्रीजा अकुला यांच्यावर ३-० ( ११-४, ११-३, ११-८ ) अशी मात केली.
BookMyShow वरून त्यांचे तिकीट बुक करून चाहते जागतिक दर्जाच्या खेळाचा आनंद घेऊ शकतात. सोनी स्पोर्ट्स २ एसडी आणि सोनी स्पोर्ट्स टेन २ एचडी या चॅनेलवर आणि Sony Liv app थेट प्रक्षेपण पाहू शकतात.
महत्वाच्या बातम्या –
ब्रिस्बेन हीट दुसऱ्यांना बीबीएल चॅम्पियन! फायनलमध्ये सिडनी सिक्सर्सला नमवत 11 वर्षांची जिंकली ट्रॉफी
महाराष्ट्राचा जिम्नॅस्ट आर्यन दवंडेने आणखी दोन सुवर्णपदक जिंकली, त्याच्या पदकाची संख्या झाली ४