---Advertisement---

पाकिस्तानविरुद्ध भारतीय सलामीवीरांची साफ निराशा, आयसीसी स्पर्धेत तिसऱ्यांदाच घडली ‘अशी’ गोष्ट

---Advertisement---

टी-२० विश्वचषकाच्या मैदानात भारत आणि पाकिस्तानमध्ये रविवारी (२४ ऑक्टोबर) रोमांचक सामना पार पडला. या सामन्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते, पण भारतीय सलामीवीरांनी चाहत्यांची चांगलीच निराशा केली. सामन्यात भारताची सुरुवात काही चांगली राहिली नाही. भारताचे सलामीवीर रोहत शर्मा आणि केएल राहुल संघाला चांगली सुरुवात देऊ शकले नाहीत.

या सामन्यात भारताचे सलमीवीर पाच धावा सुद्धा करू शकले नाहीत. सलामीवीर रोहित शर्माने या सामन्यात केवळ एका चेंडूचा सामना केला आणि त्या चेंडूवर त्याने विकेट गमावली. रोहितला पाकिस्तानविरुद्ध एकही धाव करता आली नाही. तसेच भारताचा दुसरा सलामीवीर फलंदाज केएल राहुलही खूप स्वस्तात बाद झाला. राहुलने केवळ आठ चेंडूंचा सामना केला आणि तीन धावा करू तो तंबूत परतला.

या सामन्यात ज्याप्रकारे भारताचा सलामीवीरांनी चाहत्यांना निराश केले आहे, अगदी त्याचप्रकारे यापूर्वी आयसीसी स्पर्धेत दोनदा घडले आहे. यापूर्वीही दोन वेळा असे घडले आहे की, सलामीवीरांना मिळून पाच धावासुद्धा करता आल्या नव्हत्या आणि त्यांनी चाहत्यांनी निराश केले होते.

साल १९८३ मध्ये भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या सामन्यात भारतीय सलामीवीर संघाला चांगली सुरुवात देऊ शकले नव्हते आणि पाच धावांच्या आत दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते. हा सामना ट्यूनब्रिज वेल्स स्टेडियमवर खेळला गेला होता.

त्यानंतर भारत आणि न्यूझीलंड संघात २०१९ मध्ये  मँचेस्टर येथे आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला होता. या सामन्यातही भारतीय सलामीवीर पाच धावांचा टप्पा पार करू शकले नव्हते. त्यानंतर आता २०२१ आयसीसी टी-२० विश्वचषकात भारतीय सलामीवीर पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत आणि पाच धावांचा टप्पाही पार करू शकले नाहीत.

या सामन्यात भारताला २० षटकांत ७ बाद १५१ धावा करता आल्या. यामध्ये विराट कोहलीने अर्धशतक करत ५७ धावांचे योगदान दिले. तर, रिषभ पंतने ३९ धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानने १५२ धावांचे आव्हान १७.५ षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केले. बाबर आझमने नाबाद ६८ धावा केल्या, तर मोहम्मद रिझवानने नाबाद ७९ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

विराटचं अर्धशतक ठरलं विश्वविक्रमी! ‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेललाही टाकले मागे

टी२० विश्वचषक: श्रीलंकेचा सलग चौथा विजय, बांगलादेशला पाच विकेट्स राखून चारली पराभवाची धूळ

भर मैदानात राडा! बांगलादेशच्या फलंदाजाला भिडला श्रीलंकन गोलंदाज, बाचाबाचीचा व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---