---Advertisement---

IND vs ENG: पहिल्या कसोटीसाठी अशी असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग 11, सलामी कोण देणार?

On: रविवार, जून 15, 2025 6:52 PM
---Advertisement---

India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड संघात 20 जूनपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना 20 जूनपासून हेडिंग्ले, लीड्स येथे खेळवला जाईल. याआधीच बीसीसीआयने (BCCI) पाचही कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे, तर इंग्लंडने सध्या फक्त पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर केला आहे. तत्पूर्वी या बातमीद्वारेण आपण पहिल्या कसोटीत भारताची प्लेइंग कशी असू शकतो याबद्दल जाणून घेऊयात. (India vs England Playing XI)

इंग्लंडमधील इंट्रा-स्क्वाड (intra-squad) सामना असो किंवा इंग्लंड लायन्सविरुद्धचा सराव सामना, केएल राहुलने सलामी दिली आहे. अशा स्थितीत हे स्पष्ट आहे की, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत केएल राहुल सलामीला फलंदाजी करेल. ((KL Rahul Opening) त्यामुळे साई सुदर्शनला कसोटी पदार्पणासाठी प्रतीक्षा करावी लागेल. केएल राहुलसोबत यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करेल.

कर्णधार शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. तो यापूर्वीही याच स्थानावर खेळला आहे. त्यानंतर विराट कोहलीच्या जागी चौथ्या क्रमांकावर करुण नायर खेळण्याची शक्यता आहे. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. अशा परिस्थितीत कर्णधार शुबमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर त्याला बाहेर बसवण्याची चूक करणार नाहीत. (Karun Nair Test comeback)

मध्यक्रमात पाचव्या क्रमांकावर उपकर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत खेळताना दिसेल. (Rishabh Pant WK) त्यानंतर सहाव्या क्रमांकावर नितीश कुमार रेड्डी आणि सातव्या क्रमांकावर रवींद्र जडेजा खेळणेही निश्चित आहे. त्यानंतर शार्दुल ठाकूर मैदानात दिसेल. वेगवान गोलंदाजीत प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह असतील. खरं तर, अर्शदीप सिंगच्या रुपात एक डावखुरा वेगवान गोलंदाजही पर्याय म्हणून उपलब्ध आहे, पण पहिल्या कसोटीत कृष्णावर विश्वास दाखवला जाऊ शकतो. (Prasidh Krishna Test Debut)

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल (कर्णधार), करुण नायर, रिषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज (भारत प्लेइंग इलेव्हन)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---