---Advertisement---

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ‘असा’ आहे भारताचा संभाव्य संघ; ‘हा’ गोलंदाज करू शकतो पदार्पण

On: मंगळवार, जानेवारी 5, 2021 7:28 PM
---Advertisement---

सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ७ जानेवारीपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ दुसऱ्या कसोटीतील विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियन संघ दुखापतग्रस्त खेळाडूंचे पुनरागमन झाल्याने नव्या जोमाने या कसोटीत उतरेल.

भारतीय संघ या सामन्यात आपल्या अंतिम अकराच्या संघात दोन बदल करण्याची शक्यता आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवाल खास कामगिरी करू शकला नाही. त्याने कसोटी सामन्यांच्या चार डावात फलंदाजी करताना अनुक्रमे १७, ९, ० आणि ५ धावा केल्या आहेत.  त्याच्या सुमार फलंदाजीला पाहता भारतीय संघ व्यवस्थापन त्याला वगळण्याचा विचार करू शकते. त्याच्याजागी विस्फोटक फलंदाज रोहित शर्माला संघात स्थान देण्यात येईल.

या सामन्याद्वारे रोहितचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन होणार हे निश्चित असून त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापुर्वी चेतेश्वर पुजारा संघाचा उपकर्णधार होता.

याव्यतिरिक्त बॉक्सिंग डे कसोटीत झालेल्या दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज उमेश यादवने अखेरच्या २ सामन्यातून माघार घेतली आहे. त्यामुळे यादवच्या जागी युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला अंतिम ११ जणांच्या पथकात सामील करण्यात येण्याची शक्यता आहे. उर्वरित संघ बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील संघाप्रमाणेच असेल, अशी संभावना आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्याचा भारताचा संभाव्य संघ-

रोहित शर्मा (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिषभ पंत, हनुमा विहारी, रविंद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी

महत्त्वाच्या बातम्या-

चौथ्या कसोटीचे आयोजन स्थळ बदलण्याच्या चर्चांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे स्पष्टीकरण, म्हणाले…

पुन्हा बाहेर जेवणासाठी जाऊ नकोस…! शुभमन गिलला मिळाला मजेशीर सल्ला

“तिसऱ्या सामन्यात रोहित द्विशतक ठोकेल”, भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---