---Advertisement---

“तिसऱ्या सामन्यात रोहित द्विशतक ठोकेल”, भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी

On: मंगळवार, जानेवारी 5, 2021 4:30 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा प्रमुख सलामी फलंदाज रोहित शर्मा हा तिसर्‍या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे 7 जानेवारी पासून सिडनीत सुरू होणार्‍या कसोटी सामन्यात त्याचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे भारतीय संघाचे माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी रोहित शर्मा बद्दल एक भविष्यवाणी वर्तवली आहे, की तो तिसर्‍या सामन्यात मोठे शतक लगावेल.

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आहे. त्या ठिकाणी चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यापैकी दोन सामने पार पडले आहेत. ज्यामध्ये दोन्ही संघाने एक सामना जिंकून मालिकेत बरोबरी केली आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या दृष्टीने तिसरा सामना महत्वाचा आहे. तिसर्‍या सामन्यात रोहित शर्मा प्लेईंग इलेव्हन मध्ये जागा मिळू शकते.

मयंकच्या जागी रोहितला द्यावी संधी

त्याच्याबद्द्ल व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे मत आहे की , तिसर्‍या कसोटी सामन्यात मयंक अगरवालच्या जागी रोहित शर्माला संधी द्यावी. कारण मयंक अगरवाल दोन्ही कसोटी सामन्यांच्या चार डावात फलंदाजी करताना अपयशी ठरला आहे. त्याने चार डावात 17, 9, 0 आणि 5 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला विश्रांती द्यावी.

स्टार स्पोर्ट सोबत ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात बोलताना व्हीव्हीएस व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाले, “भारतीय संघ रोहित शर्माच्या पुनरागमनाने खूप खुश असेल, विशेषतः जेव्हा विराट कोहली संघात नाही. आपल्या भारतीय संघात अधिक अनुभव पाहिजे, कारण आता सिडनीत 2-1 अशी आघाडी घ्यायची आणि त्यानंतर 3-1 या फरकाने मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे.”

व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाले, “रोहित शर्मा आपले कौशल्य दाखवेल कारण की, माझे म्हणने आहे की, त्याच्या फलंदाजीसाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्या अनुकूल आहेत. जर त्याच पाय धावपट्टीवर स्थिरावले, तर तो नव्या चेंडूचा चांगल्या प्रकारे सामना करतोय. त्यामुळे मला पूर्ण विश्‍वास आहे की, तो मोठे शतक ठोकेल. ”

रोहित शर्माची कसोटीतील कामगिरी

रोहित शर्माने 2013 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 32 कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यामधे त्याने 52 कसोटी सामन्यात फलंदाजी केली आहे. ज्यामधे त्याने 46.54 च्या सरासरीने 2141 धावा काढल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 212 आहे. यामधे त्याने 6 शतके ठोकली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

कसोटीत शुन्यावर बाद होणं महापाप! ‘या’ तीन आशियायी फलंदाजांनी तर सलग तीन डावात केलंय हे काम

धक्कादायक! आयपीएलच्या सामन्यावर सट्टा लावू इच्छित होती एक व्यक्ती, भारतीय खेळाडूशी साधला होता संपर्क

वाढदिवस विशेष : परदेशात भारतीय संघाला पहिली कसोटी मालिका जिंकून देणारा कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---