भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मंगळवार, २३ मार्च रोजी पुणे क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या वनडे मालिकेत भारतीय संघाकडे सलामी फलंदाजीचे ४ पर्याय आहेत. त्यापैकी दोन खेळाडू भारतीय संघाचा डाव सुरू करतील. रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल आणि शुभमन गिलच्या रूपात भारताकडे चार सलामीवीर फलंदाज आहेत.
परंतु भारतीय संघातील शिखर धवन आणि रोहित शर्माची सलामी जोडी भारतीय संघासाठी मागील सहा वर्षांपासून चांगली कामगिरी करत असून ज्या दिवशी धवन-रोहित जोडी फॉर्ममध्ये असते त्या दिवशी ही जोडी थांबविणे कोणत्याही गोलंदाजासाठी सोपे नसते. म्हणून इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातही रोहित शर्मा आणि शिखर धवनची जोडी सलामीसाठी मैदानात उतरू शकते.
या सलामी जोडीमुळे केएल राहुल आणि शुबमन गिल यांना पहिल्या वनडे सामन्यांच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडावे लागेल. या जोडीबद्दल बोलायचे झाल्यास, हे दोन्ही सलामीवीर फलंदाज ऑस्ट्रेलिया दौर्यामध्ये भारताच्या संघाचा एक भाग होते. मात्र या दोन्ही फलंदाजांची कोणतीही महत्त्वपूर्ण कामगिरी दिसून आली नाही. तसेच टी -20 मालिकेतही केएल राहुलची बॅट पूर्णपणे शांत होती. अशा परिस्थितीत त्याची प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. इंग्लंडविरुद्ध टी२० मालिके दरम्यान केएल राहुलने ४ सामन्यात केवळ १५ धावा केल्या.
पहिल्या वनडे सामन्यातील भारताचा संभाव्य संघ –
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कृणाल पंड्या, हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, युजवेंद्र चहल
महत्वाच्या बातम्या:
एक शतक आणि विराटच्या निशाण्यावर तीन दिग्गजांचे विक्रम
अद्वितीय! युवराजच्या कारकिर्दीला लाभली सोनेरी किनार, उंचावली आणखी एक ट्रॉफी
अन् दस्तरखुद्द आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला; सोशल मीडियावर होतंय कौतुक