---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारताची संभाव्य प्लेइंग 11, या खेळाडूंना मिळणार संधी!

On: सोमवार, फेब्रुवारी 17, 2025 8:36 PM
---Advertisement---

यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) सुरू होण्याची तारीख अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या मेगा स्पर्धेची सुरूवात (19 फेब्रुवारी) पासून होईल. शुभांरभ सामन्यातच यजमान पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे, तर भारतीय संघ (20 फेब्रुवारी) बांगलादेशशी भिडेल.

पण या सामन्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांना प्लेइंग इलेव्हन निवडण्यासाठी खूप विचारमंथन करावे लागेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी यष्टीरक्षक म्हणून भारताकडे 2 पर्याय आहेत. ‘केएल राहुल’ची (KL Rahul) संघात निवड झाली आहे, तर ‘रिषभ पंत’चेही पुनरागमन झाले आहे. आता मोठा प्रश्न असा आहे की या दोन्ही खेळाडूंपैकी कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल.

रिषभ पंत वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या जुन्या लूकमध्ये नाही, पण केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार खेळी केली होती. अशा परिस्थितीत, राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याची शक्यता जास्त आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ 5 फिरकीपटूंसह मैदानात उतरणार आहे. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), अक्षर पटेल (Axar Patel), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar), वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) हे संघाचा भाग आहेत. यापैकी भारतीय संघ 3 फिरकीपटूंसह मैदानात उतरू शकतो. अशा परिस्थितीत फिरकीपटू भारतीय संघाचे तारणहार ठरू शकतात.

भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमी (Mohammed Shami), अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हे खेळाडू खेळताना दिसू शकतात.

बांगलादेशविरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाची संभावित प्लेइंग 11- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी

महत्त्वाच्या बातम्या-

क्रिकेटपटू जहीर खानची नवी घरखरेदी, किंमत ऐकून तुमच्याही भुवया उंचावतील!
RCB vs DC; आरसीबीनं जिंकला टाॅस; गोलंदाजीचा निर्णय! जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
“केएल राहुलचा ‘अलग सफर’ – टीमपासून वेगळी दिशा, बसच्या ऐवजी कारने गाठले हॉटेल!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---