येत्या १८ जून रोजी भारत आणि न्यूझीलंड संघामध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. दोन्ही संघ सध्या तगड्या फॉर्ममध्ये असून दोन्ही संघांकडून कडवी लढत होणे अपेक्षित आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये विलगीकरणात आहे. इतक्या कमी वेळेत भारतीय खेळाडूंना इंग्लंडच्या वातावरणाशी जुळवून घेणे कठीण जाणार आहे. अश्या परिस्थितीत आता पासूनच प्लेइंग इलेव्हन निवडणे भारतीय संघाला गरजेचे आहे. या लेखातून आपण जाणून घेऊया कशी असेल भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन.
सलामीची जोडी- सलामी जोडीबाबत बोलायचे झाल्यास रोहित शर्मा आणि शुभमन गिल ह्या दोन फलंदाजाना संधी मिळण्याची शक्यता आहे. गरजेच्या वेळी हे दोघे आक्रमक फलंदाजी सुद्धा करू शकतील. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून शुभमन गिलचा आत्मविश्वास वाढला आहे. आणि रोहित शर्माला इंग्लिश वातावरणाची सवय आहे. म्हणून भारतीय संघ याच सलामी जोडीला पसंती देण्याची शक्यता आहे.
मधली फळी- मधल्या फळीत कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि उप-कर्णधार हे तीन फलंदाज अजिंक्य रहाणे असतील. या तिघांवर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. या तिघांकडेही इंग्लंडची खेळपट्टी आणि तिथल्या वातावरणाचा अनुभव आहे.
यष्टीरक्षक- आक्रमक फलंदाज रिषभ पंतच्या खांद्यावर यष्टीरक्षकाची जवाबदारी असणार आहे. पंत गेल्या इंग्लंड दौऱ्यात आक्रमक फलंदाजी करताना दिसून आला होता. त्यामुळे निश्चितच त्याला अंतिम संघात संधी मिळेल.
गोलंदाजी- वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी ह्या त्रिकुटाची जोडी असेल. फिरकी गोलंदाजीचा विभाग अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्याकडे असेल. हे दोघेही वेळ आल्यास फलंदाजी सुद्धा करतील. त्यामुळे गोलंदाजी मध्ये काही बदल नसेल असा अंदाज आहे.
संभाव्य संघ – रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीने थेट स्कॉटलंडवरुन मागवला खास घोडा, किंमत पाहून तुम्हीही व्हाल थक्क
विराट किंवा रोहित नाही तर गावसकरांच्या मते हा आहे टी२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज
कमालच! सहा वर्षांचा चिमुकला चक्क धोनी स्टाइलमध्ये मारतो आहे हेलिकॉप्टर शॉट, पाहा व्हिडिओ