वेस्ट इंडीजविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताला 12 जुलै पासून खेळायचा आहे. भारताला या वेस्ट इंडीज दौऱ्यात एकूण 10 सामने खेळायचे आहेत, त्यापैकी दोन सामने हे कसोटी असतील. पण कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन निवडताना यावेळी संघ व्यवस्थापनापुढे मोठा पेच असणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज (West Indies Vs India 1st Test) यांच्यातील पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून डॉमनिकामध्ये खेळला जाईल. या सामन्यात भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर कोणता फलंदाज खेळणार, हा पेच तयार झाला आहे. चेतेश्वर पुजारा या संघाचा भाग नसल्यामुळे यावेळी संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर कोणाला खेलवावे, हा प्रश्न संघ व्यवस्थापनापुढे आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यासाठी हा निर्णय थोडा कठीण आहे. पण ही जबाबदारी अजिंक्य रहाणे आपल्या खांत्यावर घेऊ शकतो.
भारतीय संघाच्या कसोटी इतिहासात अजिंक्य रहाणे हे नाव मोठे आहे. रहाणेकडे मोठ्या सामन्यांमध्ये खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. याच पार्श्वभूमीवर वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची जबाबदारी चोख पार पाडू शकतो. जर असे होऊ शकले नाही, तर विराट कोहली हादेखील पर्याय संघाकडे आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी यशस्वी जयस्वाल यालाही पाठवले जाऊ शकते. जयस्वालसाठी हा कसोटी पदार्पण असेल. असे असले तरी, तिसरा क्रमांक नेहमीच कसोटी सामन्यात महत्वाचा राहिला आहे. असात नवक्या जयस्वालपेक्षा रहाणेला पाढवण्याचा प्रयत्न संघ व्यवस्थापनाचा असू शकतो.
सलामीवीर म्हणून शुबमन गिल आणि रोहित शर्मा ही जोडी निश्चित आहे. मागच्या मोठ्या काळापासून या दोघांनीच भारतासाठी सलामीवीराची भूमिका पार पाडली आहे. अशात संघ व्यवस्थापन त्यांच्या फलंदाजी क्रमात बदल करण्याचा विचार करणार नाही. चौथ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजी करू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये विराट नेहमीच चौत्या क्रमांकावर केळत आहे. अशात यावेळीही त्याला चौथ्याच क्रमांकावर खेळवले जाईल, अशी पूर्ण शक्यता आहे. मागच्या बऱ्याच दिवासांपासून चाहत्यांना विराटचे कसोटी शतक पाहायचे आहे. असात वेस्ट इंडीजच्या धरतीवर ही इच्छा पूर्ण होऊ शकते.
यष्टीरभक फलंदाज म्हणून संघाकडे केएस भरत आणि ईशान किशन हे दोन पर्याय आहेत. केएस भरतला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संधी मिळाली होती. अशात यावेळी ईशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले जाऊ शकते. रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडतील, असे सांगितले जात आहे. फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यालाही संधी मिळू शकते, जो फलंदाजीतही संघाच्या कामी येतो. वेगवान गोलंदाजांचे नेतृत्व मोहम्मद सिराज करताना दिसू शकतो. सिराजच्या साथीला मुकेश कुमार किंवा नवदीप सैना यापैकी एकाला संधी दिली जाईल. (India’s probable playing XI for the first Test against West Indies)
वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारताची संभावित प्लेइंग 11 –
रोहित शर्मा, शुभमन गिल, रहाणे, विराट कोहली, यशस्वी जायसवाल, ईशान किशन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अश्विन, नवदीप सैनी/मुकेश कुमार, मोहम्मद सिराज
महत्वाच्या बातम्या –
रिषभ पंतचे ग्राउंडवर कमबॅक! खास सामन्यासाठी हार्दिक पंड्यासोबत लावली हजेरी
डेविड वॉर्नरला ट्रोल करण्यासाठी स्टुअर्ट ब्रॉडच्या वडिलांचे ट्वीट! आयसीसीने घेतली ऍक्शन