पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमधून भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. दुहेरीत सात्विक साईराज (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) या जोडीने आपापल्या पहिल्या सामन्यात दमदार विजय मिळवून सुरुवात केली आहे. या स्टार जोडीने फ्रेंच जोडी कोर्वी आणि लाबरचा 21-17 आणि 21-14 असा पराभव केला. सात्विक-चिरागने 46 मिनिटांत सामना जिंकून शानदार विजयासह पॅरिस ऑलिम्पिकची सुरुवात केली.
Satwiksairaj & Chirag Shetty are cruising through to victory at #Paris2024 🙌
Keep watching the action LIVE only on #JioCinema & #Sports18 👈#OlympicsonJioCinema #OlympicsonSports18 #Cheer4Bharat pic.twitter.com/z4Ay59AWaV
— JioCinema (@JioCinema) July 27, 2024
भारताची स्टार बॅडमिंटन जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी पॅरिस ऑलिम्पिकची धमाकेदार सुरुवात केली आहे. पुरुष दुहेरीत यजमान संघाच्या बॅडमिंटन संघाने त्यांच्या पहिल्या सामन्यात कोर्वी आणि लाबर यांचा पराभव केला. या सामन्यात भारतीय जोडीला फ्रेंच जोडीकडून जोरदार टक्कर मिळाली. परंतू चिराग आणि सात्विकने दोन्ही गेम जिंकले आणि पुढील फेरीत प्रवेश केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs SL; पहिल्याच सामन्यात सूर्या चमकला, ठोकले झंझावाती अर्धशतक
पॅरिस ऑलिम्पिक : टेबल टेनिसमध्ये भारताचा दबदबा, बॅडमिंटनमध्येही शानदार कामगिरी
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये डोपिंगचे पहिले प्रकरण समोर, इराकच्या जुडोपटूचे स्वप्न भंगणार