शनिवारी (२० ऑगस्ट) फुटबॉल क्षेत्रातून काळीज तोडणारी बातमी पुढे आली आहे. भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार समर बद्रू बॅनर्जी यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते. बद्रू दा नावाने प्रसिद्ध बॅनर्जी अलजाइमर, एजोटेमिया आणि उच्च रक्तदाबाशी संबंधित आजारांनी पिडीत होते. त्यांना कोविड-१९ या जागतिक महामारीचीही लागण झाली होती.
मोहन बागानचे सचिव देबाशीष दत्ता यांनी बॅनर्जी यांच्या निधनाबद्दलची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “बॅनर्जींची ( Samar ‘Badru’ Banerjee) तब्येत बिघडल्यानंतर त्यांना राज्यातील क्रिडामंत्री अरूप विश्वास यांच्या देखरेखीखाली सरकारी एसएसकेएम रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांनी शनिवारी पहाटे सुमारे २ वाजून १० मिनिटाला शेवटचा श्वास घेतला. ते आमचे प्रिय बद्रू दा होते. आम्ही त्यांना २००९ मध्ये मोहन बागान रत्नाने गौरवले होते. आम्ही एक दिग्गज गमावला आहे.”
निधनानंतर बॅनर्जी यांचे पार्थिव शरीर फुटबॉल क्लबमध्ये आणले गेले आहे, जिथे त्यांच्या घरच्या सदस्यांनी आणि प्रशंसकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
AIFF condoles the demise of Samar 'Badru' Banerjee
Read 👉 https://t.co/NQscrabLWO#RIP #IndianFootball pic.twitter.com/0BST8mzUH2
— Indian Football Team (@IndianFootball) August 20, 2022
भारतीय फुटबॉल संघाने बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाखाली ३ वेळा ऑलिंपिक खेळले होते. त्यापैकी १९५६ साली संघाने सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली १९५६ सालच्या ऑलिंपिकमध्ये भारतीय फुटबॉल संघ ऐतिहासिक चौथ्या स्थानावर राहिला होता. यावेळी भारतीय संघ कांस्य पदकाच्या प्लेऑफ सामन्यात बुल्गारियाकडून ०-३ ने पराभूत होत चौथ्या स्थानावर राहिला होता. या युगाला भारतीय फुटबॉलचे सुवर्ण युग म्हटले जाते.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO। ‘आलिशान व्हिला, चमचमता स्विमिंग पूल’ हार्दिक पंड्याची लग्जरी लाईफस्टाईल पाहिलीत का?
सोलापूर ते नागालँड अन् थेट टीम इंडिया असा प्रवास करणाऱ्या किरणची रोमहर्षक कहाणी, एकदा वाचाच