भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील 5 सामन्यांच्या बाॅर्डर-गावसकर (Border Gavaskar Trophy) मालिकेतील पहिला सामना पर्थच्या मैदानावर रगला आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) पहिल्या डावात 3 चौकारांसह 1 षटकाराच्या मदतीने 37 धावा केल्या. पण भारतासाठी ही डावातील दुसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. या धावांच्या जोरावर पंतने मोठ्या दिग्गजांना पराभूत करत आणि एका खास रेकाॅर्डमध्ये अव्वल स्थान मिळवले.
खरेतर, आता रिषभ पंतने (Rishabh Pant) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या संघांसोबत यष्टीरक्षक म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. यापूर्वी हा रेकार्ड इंग्लंडचा माजी यष्टीरक्षक ॲलन नॉटच्या नावावर होता. नॉटने ऑस्ट्रेलियात 646 धावा केल्या होत्या. आता पंतने 661 धावा करत ॲलन नॉटचा रेकाॅर्ड मोडला.
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी धावा करणारा पाहुण्या संघाचे यष्टीरक्षक-
रिषभ पंत- 661 धावा
ॲलन नॉट- 643 धावा
जेफ दुजोन- 587 धावा
सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवशी एकूण 17 विकेट्स पडल्या. टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय संघ 150 धावांवर सर्वबाद झाला. यादरम्यान भारतासाठी नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक 41 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने (Josh Hazlewood) या डावात सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क, मिचेल मार्श आणि पॅट कमिन्सने 2-2 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने दिवसअखेर 7 गडी गमावून 67 धावा केल्या. दरम्यान भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. उर्वरित 2 विकेट्स मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) तर पदार्पण करणाऱ्या हर्षित राणाने (Harshit Rana) 1 विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; झेल सोडण्यात कोहली पटाईत, पाकिस्तानच्या बाबर आझमलाही टाकलं मागे
VIDEO; “लिलावात कुठे जाणार आहेस?” विचारलेल्या प्रश्नावर रिषभ पंतने दिले उत्तर
IND vs AUS; केएल राहुलवर कारवाई करणार आयसीसी? नेमकं प्रकरण काय?