गोल्ड कोस्ट |ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आज शुटींगमध्ये कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतने सुवर्णपदकाची कमाई केली. हे भारताचे स्पर्धेतील १५वे सुवर्णपदक ठरले.
तिने ५० मीटर रायफल ३ पोझीशन प्रकारात ही कामगिरी केली. तिने आज या प्रकारात ४५७.९ गुणांची कमाई केली. तिने भारताच्याच अंजूम मोडगिलला मागे टाकत ही कामगिरी केली. ही कामगिरी करताना तिने राष्ट्रकूलमध्ये या प्रकारात सर्वाधिक गुण घेण्याचा पराक्रमही केला.
अंजूमने या प्रकारात ४५५.७गुण घेत ही कामगिरी केली.
कालच तेजस्विनीने ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्यपदक पटकावले होते.
तेजस्विनी सावंत यापुर्वी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रोन प्रकारातच रौप्य पदक पटकावले होते.
तिला आजपर्यंत २०१० राष्ट्रकुल स्पर्धेतच्या स्पर्धेत एकूण तीन पदके तर २००६मध्ये मेलबर्न राष्ट्रकुल स्पर्धेत २ सुवर्ण पदके मिळाली आहेत.
तिचे राष्ट्रकुल स्पर्धेत स्पर्धेतील हे एकूण ७वे पदक ठरले आहे.
२०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची आता एकूण ३३ पदके झाली असून त्यात १५ सुवर्ण, ८ रौप्य आणि १० कांस्यपदक आहेत.