---Advertisement---

भारताच्या कसोटी क्रिकेट इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच घडली ही घटना

---Advertisement---

कोलकाता। भारताने बांगलादेश विरुद्ध इडन गार्डनवर झालेल्या दिवस-रात्र कसोटीत आज एक डाव 46 धावांनी विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाजांनी महत्त्वाचा वाटा उचलला. या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी 19 विकेट्स घेतल्या आहेत.

विशेष म्हणजे या सामन्यात भारताच्या एकाही फिरकी गोलंदाजांना विकेट घेता आलेली नाही. त्यामुळे कसोटीमध्ये असे दुसऱ्यांदाच झाले आहे की भारताने विजय मिळवलेल्या सामन्यात एकाही फिरकी गोलंदाजांने विकेट घेतलेली नाही.

याआधी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग येथे भारताने विजय मिळवलेल्या कसोटी सामन्यात भारताच्या एकाही फिरकी गोलंदाजाने विकेट घेतली नव्हती. या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या सर्व 20 विकेट्स घेतल्या होत्या.

कोलकाताला झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात भारताकडून इशांत शर्माने सर्वाधिक 9 विकेट्स घेतल्या. तसेच उमेश यादवने 8 विकेट्स आणि मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या.

https://twitter.com/Maha_Sports/status/1198534703357124608

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---