आयर्लंडविरुद्ध मंगळवारी (२८ जून) डब्लिन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर ४ धावांनी विजय मिळवला आणि मालिका २-० सह खिशात घातली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने दीपक हुड्डा याच्या शतकी खेळीच्या जोरावर ७ विकेट्सच्या नुकसानावर २२५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आयर्लंड संघाला २२१ धावाच करता आल्या आणि भारताने ४ धावांच्या फरकाने सामना जिंकला. या सामन्यादरम्यान भारतीय संघाने एक अनोखा आणि अद्भुत विक्रम आपल्या नावावर केला आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून (Team India) दीपक हुड्डा (Deepak Hooda) आणि सलामीवीर संजू सॅमसन यांनी विस्फोटक आणि मोठ्या खेळी केल्या. कारकिर्दीतील पाचवाच टी२० सामना खेळत असलेल्या हुड्डाने आयर्लंडच्या गोलंदाजांसाठी धू धू धुलाई केली. त्याने ५७ चेंडूत ६ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने १०४ धावांनी वादळी खेळी केली. हे त्याच्या टी२० कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक ठरले.
तसेच ऋतुराज गायकवाडच्या जागी सलामीवीर म्हणून संधी मिळालेल्या संजू सॅमसननेही ४२ चेंडूत ७२ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ षटकार आणि ९ चौकार मारले. या दोघांव्यतिरिक्त कर्णधार हार्दिक पंड्या (१५ धावा) आणि सूर्यकुमार यादव (१५ धावा) यांनी थोडेफार योगदान दिले. मात्र इतर फलंदाजांना साध्या एकेरी धावाही करता आल्या नाही. दिनेश कार्तिक, अक्षर पटेल आणि हर्षल पटेल यांनी तर पहिल्याच चेंडूवर शून्य धावेवर (गोल्डन डक, Golden Duck) विकेट गमावल्या.
अशाप्रकारे ३ फलंदाज गोल्डन डक झाल्यानंतरही भारतीय संघाने २०० पेक्षा जास्त धावा फलकावर नोंदवत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आजवर टी२० क्रिकेटमध्ये ११ हजार सामने खेळले गेले आहेत. मात्र ३ फलंदाज शून्यावर बाद झालेले असतानाही सर्वोच्च सांघिक धावसंख्या नोंदवण्याचा विश्वविक्रम एकट्या भारतीय संघाने आपल्या नावावर केला आहे. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये आजवर कोणत्याही संघाला अशी विलक्षण कामगिरी जमलेली नाही. एकूण टी२० क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, असा पराक्रम करणारा भारत तिसरा संघ आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एकमेवाद्वितीय! आजच्याच दिवशी १५ वर्षांपूर्वी सचिन ठरला होता ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव क्रिकेटपटू
आयर्लंडसाठी ‘कर्दनकाळ’ ठरला दीपक हुड्डा, शतक ठोकत रोहित शर्मावरही ठरला वरचढ