भारतीय संघाने टी20 विश्चषक 2024 चा खिताब आपल्या नावे केला आहे. शनिवारी झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी20 विश्वचषकमधील अंतिम सामन्यात टीम इंडियाने 7 धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला. आणि गेल्या वर्षी 19 नोव्हेंबरला अहमदाबादमधील अधुरे स्वप्न अखेर वेस्ट इंडिजमध्ये पूर्ण झाले, तेव्हा रोहित शर्माच्या संघासह टीव्हीसमोर बसलेल्या भारतीय क्रिकेट चाहत्यांचे डोळे भरून आले होते. या आयसीसी जेतेपदासाठी 11 वर्षांची प्रतीक्षा होती आणि या विजयाचा नायक विराट कोहली होता ज्याने विजयासोबतच टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही अलविदा केला. विराट कोहलीनंतर रोहित शर्मानेही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
टीम इंडियाच्या टी20 विश्वचषक विजयानंतर स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या खूप भावूक झाला होता. भारताच्या टी20 विश्वचषक विजेतेपदाच्या नायकांपैकी एक असलेला उपकर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, टी20 विश्वचषकापूर्वीचे कठीण काही महिने पाहता, संधी मिळाल्यावर तो चमकेल असा विश्वास होता. हार्दिक पांड्या म्हणाला, ‘मी खूप भावूक होत आहे. संपूर्ण देश या विजयाची वाट पाहत होता. विशेषतः माझ्याबद्दल बोलायचे झाले तर मी गेल्या सहा महिन्यांत एक शब्दही बोललो नाही. गोष्टी अयोग्य होत होत्या, पण मला माहित होते की एक वेळ येईल जेव्हा मी चमकेन. या प्रकारच्या संधीमुळे ते अधिक खास झाले आहे.
हार्दिक पांड्याने यंदाच्या टी20 विश्वचषकात भारतीय संघासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. संघास गरज असताना पलंदाजीत त्याने 144 धावा करण्यासोबतच 11 विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात तीन बहुमुल्य विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यानंतर हार्दिक पांड्यावर बरीच टीका झाली होती. त्या सर्व टीकाकारांना हार्दिक पांड्याने आपल्या कामगिरीने उत्तर दिले आहे.
महत्तवाच्या बातम्या-
धक्कादायक…! विराट पाठोपाठ रोहित शर्माची देखील टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती
आनंदात धक्कादायक क्षण…!!! विराटची टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर
टीम इंडियानं करून दाखवलं, 11 वर्षानंतर कोरलं आयसीसी ट्राॅफीवर नाव…!!!