---Advertisement---

चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत भारताच्या युकी भांब्री धडाकेबाज सुरुवात

On: मंगळवार, फेब्रुवारी 1, 2022 1:43 PM
Yuki-Bhambri
---Advertisement---

पुणे। महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्या वतीने आयोजित व टाटा ग्रुप तर्फे प्रायोजित चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य ड्रॉ च्या पहिल्या फेरीत भारताच्या युकी भांब्री याने धडाकेबाज सुरुवात करत स्लोव्हाकीच्या जोझेफ कोवालीकचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत 862व्या स्थानी असलेल्या भारताच्या युकी भांब्री याने जागतिक क्रमवारीत 168व्या स्थानी असलेल्या स्लोव्हाकीच्या जोझेफ कोवालीकचा टायब्रेकमध्ये 6-7(12-10), 6-2, 7-5 असा तीन सेटमध्ये पराभव केला.हा सामना 3 तास 6 मिनिटे चालला. चुरशीच्या झालेल्या लढतीत पहिल्या सेटमध्ये चौथ्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला सावध खेळ केला. त्यानंतर पाचव्या गेममध्ये जोझेफने युकीची सर्व्हिस रोखली व सामन्यात 4-2 अशी आघाडी घेतली. पण ही आघाडी त्याला फार काळ टिकवता आली नाही. पुढच्याच गेममध्ये युकीने जोझेफची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत सामन्यात बरोबरी साधली. 12व्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये सुरुवातीला युकीने सुरेख खेळ केला व 3-0 अशी आघाडी मिळवली. पण मोक्याच्या क्षणी चुका केल्यामुळे याचाच फायदा घेत जोझेफने हा सेट युकीविरुद्ध 7-6(12-10) असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या युकीने आक्रमक खेळ करत जोरदार कमबॅक केले. त्याने या सेटमध्ये जोझेफची सहाव्या व आठव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 6-2 असा जिंकून आपले आव्हान कायम ठेवले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये युकीने आपल्या खेळात सातत्य राखले. सामना बरोबरीत असताना पाचव्या गेममध्ये जोझेफने युकीची सर्व्हिस भेदली. पण पुढच्याच गेममध्ये युकीने जोझेफची सर्व्हिस रोखली व बरोबरी साधली. अखेर 12व्या गेममध्ये युकीने जोझेफची सर्व्हिस रोखली व हा सेट 7-5 असा जिंकून विजय मिळवला.

जागतिक क्रमवारीत 141व्या स्थानी असलेल्या फ्रांसच्या क्विंटिन हॅलिस याने जागतिक क्रमवारीत 82व्या स्थानी असलेल्या लिथूनियाच्या रिकार्डस बेरँकीसचा 6-1, 6-2 असा सहज पराभव करून आगेकूच केली. मोलदोव्हाच्या राडू अलबोटने इटलीच्या फेडरिको गायोचा टायब्रेकमध्ये 6-2, 7-6(3) असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली.

दुहेरीत पहिल्या फेरीत फ्रांसच्या सादियो डोंबिया व फॅबियन रिबॉल या जोडीने पोलंडच्या तिसऱ्या मानांकित झिमोन वॉलकोव्ह व जेन झिलिंस्की यांचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(5) असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाच्या लूक सॅव्हीलने जॉन-पॅट्रिक स्मिथच्या साथीत इटलीच्या स्टेफनो ट्रॅव्हग्लिया व स्पेनच्या बर्नबी झपाटा मिराईल्स यांचा 6-1, 6-4 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

याआधीच्या अंतिम पात्रता फेरीत इटलीच्या जीयान मार्को मोरोनी, ब्रिटनच्या जे क्लार्क, चेक प्रजासत्ताकच्या वित कोप्रिव्हा, स्वीडनच्या एलियास येमेर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.

निकाल: एकेरी: मुख्य ड्रॉ(पहिली फेरी):
राडू अलबोट(मोलदोव्हा) वि.वि.फेडरिको गायो(इटली) 6-2, 7-6(3);
क्विंटिन हॅलिस(फ्रांस) वि.वि.रिकार्डस बेरँकीस(लिथूनिया) 6-1, 6-2;
युकी भांब्री(भारत)वि.वि.जोझेफ कोवालीक(स्लोव्हाकीया) 6-7(12-10), 6-2, 7-5;

अंतिम पात्रता फेरी:
जीयान मार्को मोरोनी(इटली)वि.वि.किमीर कोपेजन्स(बेल्जियम) 7-6(5), 6-4;
जे क्लार्क(ब्रिटन)वि.वि.अलेक्झांडर मुल्लेर(फ्रांस) 6-7(5), 6-3, 6-4;
वित कोप्रिव्हा(चेक प्रजासत्ताक)वि.वि.आलटुग सेलिकब्लिक(टर्की)6-7(7), 6-3, 7-5;
एलियास येमेर(स्वीडन)वि.वि.मार्क पोलमन्स(ऑस्ट्रेलिया)6-4, 6-4;

दुहेरी गट: पहिली फेरी:
लूक सॅव्हील(ऑस्ट्रेलिया)/जॉन-पॅट्रिक स्मिथ(ऑस्ट्रेलिया)[1] वि.वि.स्टेफनो ट्रॅव्हग्लिया(इटली)/बर्नबी झपाटा मिराईल्स(स्पेन) 6-1, 6-4;
सादियो डोंबिया(फ्रांस)/फॅबीयन रिबॉल(फ्रांस)वि.वि.झिमोन वॉलकोव्ह(पोलंड)/जेन झिलिंस्की(पोलंड)[3] 6-3, 7-6(5).

महत्त्वाच्या बातम्या – 

शानदार… जबरदस्त… जिंदाबाद…! विक्रमी २१ वे ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या नदालवर क्रिकेटविश्वातूनही कौतुकाचा वर्षाव

टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धा: मुख्य ड्रॉला युकी भांब्री, प्रजनेश गुन्नेश्वरण या भारतीय खेळाडूंच्या आव्हानापासून सुरुवात 

ऑस्ट्रेलियन ओपन नावे करत नदाल बनला टेनिसविश्वाचा राजा! जिंकले विश्‍वविक्रमी २१ वे ग्रँडस्लॅम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---