मंगळवारी (०२ फेब्रुवारी) अँटिग्वा येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात १९ वर्षांखालील विश्वचषकाचा (U19 World Cup) उपांत्य सामना (Semi Final) झाला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ५ विकेट्सच्या नुकसानावर २९० धावा केल्या. परिणामी, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २९१ धावांचे मोठे आव्हान मिळाले. या आव्हानासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १९४ धावांवर गडगडला. त्याचबरोबर भारतीय संघाने ९६ धावांनी दणदणीत विजय साजरा करत सलग चौथ्या वेळी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक दिली.
भारतीय संघाचा धावांचा डोंगर
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली नव्हती. त्यांनी १३ षटकांमध्ये केवळ ३७ धावांवर आपली सलामी जोडी गमावली होती. सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी ६ धावा तर दुसरा सलामीवीर हरनूर सिंग वैयक्तिक १६ धावांवर पव्हेलियनला परतले होते. मात्र पुढे शेख राशिद आणि कर्णधार यश धूल यांनी संघाचा डाव सावरला. त्यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागिदारी झाली.
1⃣1⃣0⃣ Off 1⃣1⃣0⃣ With 1⃣0⃣ Fours & 1⃣ Six! 🔥 🔥
How good was that knock from India U19 captain Yash Dhull! 👏 👏 #BoysInBlue #U19CWC #INDvAUS
Scorecard ➡️ https://t.co/tpXk8p6Uw6 pic.twitter.com/KysgCXvV96
— BCCI (@BCCI) February 2, 2022
पुढे कर्णधार यश ११० चेंडूत ११० धावा करत धावबाद झाला. त्याने आपल्या खेळीदरम्यान १ षटकार आणि १० चौकार मारले. तर राशिदचे शतक फक्त ६ धावांनी हुकले. १०८ चेंडूत ९४ धावा करत त्याने आपली विकेट गमावली. परंतु पुढील मधल्या आणि खालच्या फळीतील फलंदाजांनी ताबडतोब खेळी करत संघाला २९० धावांपर्यंत पोहोचवले. ऑस्ट्रेलियाकडून जॅक निस्बेट आणि विलियम सॅल्जमन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
भारताची भेदक गोलंदाजी
भारतीय संघाने दिलेल्या २९१ धावांचा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना, ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या टेगू विली याला रविकुमारने दुसऱ्याच षटकात पायचित पकडले. दुसऱ्या विकेटसाठी कॅम्पबेल व मिलर यांनी ६८ धावांचे योगदान दिले. कामचलाऊ गोलंदाज अंगक्रिश रघुवंशी याने मिलर याला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर दहा धावांच्या अंतरात कॅम्पबेल व कर्णधार कूपर कोनोली बाद झाल्याने ऑस्ट्रेलियन संघ संकटात सापडला. भारताचे प्रमुख फिरकीपटू विकी ओस्तवाल व निशांत सिंधू यांनी दोन्ही बाजूंनी गोलंदाजी करायला सुरुवात केल्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाज खेळपट्टीवर जम बसवू शकले नाहीत. लचलान शॉ एचडी याने अर्धशतक करत एकाकी झुंज दिली. जॅक सिनफील्ड व व्हीटनी या नवव्या व दहाव्या क्रमांकाच्या फलंदाजांनी अनुक्रमे २० आणि १९ धावा करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव ४१.१ षटकात १९४ धावांवर गुंडाळून ९६ धावांनी विजय साजरा केला. भारतासाठी विकी ओस्तवालने तीन तर रवी आणि निशांत सिंधूने प्रत्येकी दोन बळी मिळवले.
भारतीय संघ सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत
या विजयासह भारतीय संघाने सलग चौथ्यांदा एकोणीस वर्षाखालील मुलांचा क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मागील स्पर्धेत भारताला बांगलादेशकडून माधव पत्करावा लागला होता. भारताने खेळाच्या वेळी या स्पर्धेचे विजेतेपद २०१८ मध्ये पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वात मिळाला होते. भारत आतापर्यंत चार वेळा या स्पर्धेचा विजेता राहीला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघात कोरोनाचा स्फोट? वेस्ट इंडिज मालिकेपूर्वीच ‘हे’ दिग्गज खेळाडू बाधित
जिथे आयुष्याला डाग लागला, तिथेच तो डाग मिटवायला येतोय परत!! लिलावातील संधीवरून श्रीसंत भावुक