आज(14 सप्टेंबर) एसीसी 19 वर्षांखालील आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात 19 वर्षांखालील भारतीय संघाने 19 वर्षांखालील बांगलादेश संघाला 5 धावांनी पराभूत करत या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. भारताने 19 वर्षांखालील आशिया चषक जिंकण्याची ही सातवी वेळ आहे.
भारताच्या या विजयात मुंबईकर अथर्व अंकोलेकरने महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात 8 षटके गोलंदाजी करताना 2 षटके निर्धाव टाकण्याबरोबरच 5 विकेट्स घेतल्या. त्याच्या या 5 विकेट्समुळे विजयासाठी 107 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशचा डाव 101 धावांवर संपुष्टात आणण्यात भारताला यश आले.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 32.4 षटकात सर्वबाद 106 धावा केल्या होत्या. भारताकडून केवळ कर्णधार ध्रुव जुरेल(33), शाश्वत रावल(19) आणि करण लाल(37) यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली. या तिघांव्यतिरिक्त भारताचे अन्य फलंदाज एकेरी धावंसंख्येवरच बाद झाले.
बांगलादेशकडून मृत्यूंजय चौधरी आणि शामिम हुसेनने सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर शनिन आलम आणि तान्झिम हसन सकिबने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्यानंतर 107 धावांच्या आव्हानाचा पाठलाद करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशचीही सुरुवात खराब झाली. त्यांनी पहिल्या 4 विकेट्स 5 षटकांच्या आत 16 धावांवर गमावल्या. या 4 विकेट्सपैकी 3 विकेट्स आकाश सिंगने घेतल्या.
पण यानंतर बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने मृत्यूंजय चौधरीसह बांगलादेशचा डाव सांभाळला. मात्र बांगलादेशचा संघ 6 बाद 78 धावांवर असताना पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे काहीवेळासाठी सामना थांबला होता.
पावसाच्या व्यत्ययानंतर पुन्हा सामना सुरु झाल्यानंतर लगेचच अकबर(23) आणि मृत्यूंजय(21) या दोघांनीही विकेट्स गमावल्या. पण त्यानंतरही 9 व्या विकेटसाठी 23 धावांची भागीदारी करणाऱ्या तान्झिम हसन सकिब(12) आणि राकिबुल हसनने(11*) भारतावर दबाव आणला होता.
पण अखेर अर्थवने सकिबला आणि नंतर शानिन आलमला एकाच षटकात बाद करत बांगलादेशचा डाव 101 धावांवर संपुष्टात आणला.
या सामन्यात भारताकडून अथर्वने सर्वाधिक 5 विकेट्स तर आकाशने 3 विकेट्स घेतल्या. तसेच विद्याधर पाटिल आणि शशांक मिश्राने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
या सामन्याचा सामनावीर पुरस्कार अथर्वला देण्यात आला. तर मालिकावीर पुरस्कार अर्जून आझादला देण्यात आला.
🏆
India(U19) clinch their seventh #U19AsiaCup!
5 wickets for Atharva as it's heartbreak for Bangladesh(U19).#BANvIND pic.twitter.com/g2sv9ylm3z
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 14, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–संपूर्ण वेळापत्रक: असे होणार आहेत टीम इंडियाचे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२०, कसोटी सामने
–टॉप ५ : स्टिव्ह स्मिथच्या या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही…
–कसोटी इतिहासात कोणालाही जे जमले नाही ते स्टिव्ह स्मिथने करुन दाखवले!