शनिवार (६ ऑगस्ट) रोजी कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासातील महिला क्रिकेटचा पहिला उपांत्य सामना खेळवला जाणार आहे. या पहिल्या सामन्यात भारतीय संघ बलाढ्य इंग्लंडला भिडण्यासाठी सज्ज आहे. यासामन्यात विजय मिळवत थेट अंतिम सामन्यात प्रवेश करत कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला आणखी एक पहक मिळवून देण्याचा विचार सध्या टीम इंडियाच्या मनात असेल. अशा या महत्वाच्या सामन्यात टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
CWG 2022. India won the toss and elected to bat. https://t.co/9DdlO6jFkW #INDvENG #B2022
— BCCI Women (@BCCIWomen) August 6, 2022
यंदा पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील सगळे सामने इंग्लंडमधील बर्मिंघमच्या मैदानावर खेळवले जात आहेत. भारताने आत्तापर्यत या स्पर्धेत खेळलेल्या ३ सामन्यांपैकी २ सामन्यांत विजय मिळवला आहे. तर, दुसरीकडे इंग्लंडच्या संघाने ३ पैकी ३ सामने जिंकत उपांत्य फेरीत आपले नाव पक्के केले आहे. अशा परिस्थितीत या स्पर्धेत इंग्लंडसंघाचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.
Getting ready for the big game. ???????? #INDvENG #TeamIndia #B2022 pic.twitter.com/p7UMvXE4tE
— BCCI Women (@BCCIWomen) August 6, 2022
दरम्यान, या सामन्यात विजय मिळवत दोन्ही संघ अंतिम सामन्यात धडक मारण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये चांगली लढत पाहायला मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
असे आहेत दोन्ही संघ-
An unchanged Playing XI for #TeamIndia
Live – https://t.co/ex8lGZRthz #INDvENG #B2022 pic.twitter.com/SNvBYp4GxH
— BCCI Women (@BCCIWomen) August 6, 2022
भारतीय महिला संघ:
शेफाली वर्मा, स्म्रीती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, राधा यादव, स्नेह राणा, मेघना सिंग, रेणुका सिंग, पूजा वस्त्राकर
Unchanged again for our semi-final!
India have won the toss and will bat first.#Birmingham2022 | #BringItHome
— England Cricket (@englandcricket) August 6, 2022
इंग्लंड महिला संघ:
डॅनिएल व्याट, सोफिया डंकले, ऍलिस कॅप्सी, नताली स्कायव्हर (कर्णधार), एमी जोन्स (यष्टीरक्षक), माइया बाउचियर, कॅथरीन ब्रंट, सोफी एक्लेस्टोन, फ्रेया केम्प, इस्सी वोंग, सारा ग्लेन
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ख्रिस गेल नावाचे वादळ पुन्हा भारतात येणार! आता २२ दिवस गोलंदाजांची खैर नाही
एफआयएचच्या एका चुकीमुळे हुकली भारताची गोल्ड मेडलची संधी, ‘या’ शब्दांत मागितली क्षमा
‘या’ खेळाडूवर रोहित-द्रविडचा अन्याय! टी२० विश्वचषकासाठी दावा ठोकण्याची देत नाहीयेत एकही संधी





